शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

नेवासा पंचायत समितीमधील ठेकेदाराने शौचालयाचे अनुदान केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 9:21 PM

नेवासा पंचायत समितीकडे जळके ग्रामपंचायतीकडे शौचालयाचे प्रस्ताव नसतांनाही अनेक नागरिकांच्या नावावर शौचालय अनुदान टाकून ठेकेदाराने अनुदान परस्पर लंपास केल्याची तक्रार जळके खुर्दचे सरपंच व ग्रामसेवकांनी केली आहे.

नेवासा : पंचायत समितीकडे जळके ग्रामपंचायतीकडे शौचालयाचे प्रस्ताव नसतांनाही अनेक नागरिकांच्या नावावर शौचालय अनुदान टाकून ठेकेदाराने अनुदान परस्पर लंपास केल्याची तक्रार जळके खुर्दचे सरपंच व ग्रामसेवकांनी केली आहे.नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथील ११ लाभार्थ्यांचे स्थानिक ठेकेदाराने नागेबाबा पतसंस्थेमध्ये स्वच्छ भारत मिशन शौचालय अनुदानासाठी खाते उघडून घेतले होते. या नागरिकांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये घेतले होते. शासनाचे १२ हजार रुपये मानधन प्रत्येकाला येणार असल्याचे सांगून त्याने शौचालय बांधून देण्याचे आश्वासनही या सर्वांना दिले होते. सदरचे खाते उघडल्यानंतर मात्र ठेकेदाराने सुरु केलेले शौचालयाचे काम अपूर्ण अवस्थेतच ठेवले. लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवकांच्या लक्षात आले की, सदरच्या ११ लाभार्थ्यांना प्रस्तावच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेले नाही.अधिक तपास करता ग्रामसेवकांना गोंधळ लक्षात आला. त्यावर त्यांनी सदरचे अकराही प्रस्तावाविना उघडलेल्या खात्यांची माहिती मिळवली. ठेकेदार अरुण लक्ष्मण ताकवले (राहणार गीडेगाव) याने प्रस्ताव नसतांनाही त्या अकरा लाभार्थ्यांच्या नावावर नेवासा पंचायत समितीमधून पैसेही मंजूर करून घेतले. हे पैसे नागेबाबा पतसंस्थेच्या खात्यांमध्ये जमा झाल्यानंतर त्यानेच ते पैसे काढूनही घेतले होते. याबाबत सदरच्या अकरा लाभार्थ्यांना काहीही माहिती नव्हते. कारण खाते उघडतांनाच त्याने या लाभार्थींकडून कोरे विड्रोलवर सह्या करून घेतले होते आणि पैसे मिळूनही त्याने शौचालयाची कामे अपूर्ण ठेवली आहेत.याबाबत प्रस्ताव नसलेले स्वच्छ भारत मिशन शौचालय अनुदान बँकेतून परस्पर लंपास झाल्याबाबतचे पत्र सरपंच मिया पठाण व ग्रामसेवक जी. बी. गायकवाड यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. प्रस्तावच ग्रामपंचायतकडे नसतांनाही पंचायत समितीमधून या लोकांच्या नावावर अनुदान कसे निघाले? अद्यापही अनेक प्रस्ताव विनाअनुदान पडलेले असतांना हे पैसे कसे काय मंजूर झाले हेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा