कर्जतमधील अतिक्रमणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच : नामदेव राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:22 AM2018-12-23T11:22:43+5:302018-12-23T11:22:46+5:30

दावल मलिक दर्गा परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

Congress-NCP leaders are encroached in Karjat: Namdev Raut | कर्जतमधील अतिक्रमणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच : नामदेव राऊत

कर्जतमधील अतिक्रमणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच : नामदेव राऊत

Next

कर्जत : दावल मलिक दर्गा परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचीच ही अतिक्रमणे आहेत. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा या अतिक्रमणात थेट संबंध आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. तसेच राजकीय पक्षांनी तौसिफ शेख यांच्या मृत्यूचे राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कर्जत नगरपंचायतमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, लालासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, तौसिफ शेख यांचा आत्मदहनात मृत्यू झाला, ही घटना अत्यंत दु:खद आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायत पूर्णपणे पाठपुरावा करीत होती. त्या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध आहेत. तौसिफ शेखच्या आत्मदहनानंतर शुक्रवारी घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला. त्यात विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी नगरपंचायत व पालकमंत्र्यांवर विविध आरोप केले. परंतु दावल मलिक दर्ग्याच्या जागेशी आंदोलनात भाग घेणाऱ्या बहुतांश नेत्यांचा संबंध व अतिक्रमण आहे. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचा त्या जागेतील अतिक्रमणात थेट सबंध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व त्यांच्या सहकाºयांनी अतिक्रमित जागेचा करार केला आहे. काँग्रेसचे नेते अंबादास पिसाळ यांचे निकटवर्तीय नगरसेवक संदीप बरबडे यांचा या जागेशी संबंध आहे. अ‍ॅड. कैलास शेवाळे यांच्या बंधूचे पक्के बांधकाम आहे. नगरसेवक सचिन घुलेंचा अतिक्रमण गाळ्यात थेट संबंध आहे. नगरसेवक मोनाली तोटे यांचे पती यांचाही समावेश असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राऊत यांनी यावेळी केला. तौसिफ शेख हे दावल मलिक दर्ग्याच्या जागेवरील सर्व अतिक्रमण काढावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती, मग या नेत्यांच्या अतिक्रमणाचे काय? यात पालकमंत्री व नगरपंचायत यांचा संबंध नाही. आमच्यावर व पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. या नेत्यांनी मुस्लिम समाज व आमची माफी मागावी, अशी मागणीही राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

परवानगी घेऊनच जागा मिळविल्या : राजेंद्र फाळके

दावल मलिक दर्ग्याच्या साडे चार एकर जागेसाठी मी धर्मादाय आयुक्तांकडे १०वर्षांपूर्वी रितसर परवानगी मागितली आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर ती जागा रितसर घेण्याचा मला अधिकार आहे. सध्या त्या जागेशी माझा संबंध नाही. धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेऊन काहींनी त्या जागा मिळविल्या आहेत. - राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: Congress-NCP leaders are encroached in Karjat: Namdev Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.