शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

वीेज पुरवठा सुरळीत न ठेवल्याबद्दल शेवगावच्या अभियंत्याविरुध्द गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:36 PM

विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या कामासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी दुर्लक्ष केल्याने येथील महावितरणचे अभियंता एस. एम.लोहारे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

शेवगाव : विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या कामासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी दुर्लक्ष केल्याने येथील महावितरणचे अभियंता एस. एम.लोहारे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी निवडणूक कामात दुर्लक्ष केल्याबद्दल लोहारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवार (दि. १६) रोजी दिले. त्यानुसार, तहसील कार्यालयातील लिपीक मनोज जाधव यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी लोहारे यांच्या विरोधात फिर्याद दिली. विधानसभा निवडणुकीचे काम सुरळीत सुरू राहण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास वीज पुरवठा सुरूळीत ठेवण्याबाबत उपअभियंता तायडे यांना कळविण्यात आले होते. दि.७ आॅक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संगणक बंद पडले होते. तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  ११ आॅक्टोबर रोजी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सरमिसळचे कामकाज सुरू असतानाही वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वेळोवेळी नोटीस बजावूनही महावितरणने आजपावेतो खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे निवडणूक कामात जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी केकाण यांच्या आदेशानुसार उपअभियंता लोहारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजत्ीा ठाकरे करीत आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग