गणांत वाद्य पथकाने रक्तदान शिबिरातून जोपासली बांधीलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:26 AM2021-04-30T04:26:40+5:302021-04-30T04:26:40+5:30

अहमदनगर : कोरोना संकट काळामध्ये प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी पुढे यावे. कोरोना आजाराबरोबरच इतर आजारांच्या रुग्णांना ...

Commitment from the blood donation camp by the Ganat Band | गणांत वाद्य पथकाने रक्तदान शिबिरातून जोपासली बांधीलकी

गणांत वाद्य पथकाने रक्तदान शिबिरातून जोपासली बांधीलकी

Next

अहमदनगर : कोरोना संकट काळामध्ये प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बांधीलकी जोपासण्यासाठी पुढे यावे. कोरोना आजाराबरोबरच इतर आजारांच्या रुग्णांना रक्तदानाची अत्यंत गरज भासते. कोरोना काळात रक्तदान शिबिराचे आयोजन हे कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी नगर शहरातील गणांत वाद्य पथकाने सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे शिबिराचे आयोजन करून रक्तदान केले.

रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे गणांत वाद्य पथक तसेच रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. रवींद्र शितोळे, दत्तात्रेय जंगम, देवेंद्र गांधी, डॉ. शंकर शेडाळे, आकाश पटवेकर, योगेश बुक्कन, गणेश मोकाट, धीरज वाघस्कर, महेश देवधडे, रणवीर शितोळे, शुभम भुजबळ, चैतन्य पाटील, राजेंद्र बुलबुले, अवि नल्ला, प्रवीण देवतरसे, सिद्धार्थ बचारे, आकाश अकोलकर, सतीश फंड, हर्षल बांगर, गोकुळ गोधडे, प्रवीण गोधडे, सुशांत तरवडे, पल्लवी मोरे, सुनीता पवार, प्रमिला तेकाळे, आदींसह रक्तदाते उपस्थित होते.

यावेळी योगेश बुक्कन म्हणाले, गणांत वाद्य पथक वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. कोरोना संकट काळामध्ये इतर आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज भासते. असल्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. देवेंद्र गांधी यांनी वयाच्या साठव्या वर्षी रक्तदान करून आजच्या युवकांसमोर आदर्श उभा केला.

यावेळी गणांत पथकाचे प्रमुख आकाश पटवेकर म्हणाले, कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना संसर्ग विषाणूतून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करून कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी.

---------

फोटो- २९ गणांत पथक

गणांत वाद्य पथकाने सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात झालेल्या शिबिरात रक्तदान केले.

Web Title: Commitment from the blood donation camp by the Ganat Band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.