एनसीसीच्या एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:26 AM2021-02-25T04:26:55+5:302021-02-25T04:26:55+5:30

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे व प्रशासकीय अधिकारी कर्नल विनय बाली यांच्या उपस्थित ...

Commencement of NCC's joint annual training camp | एनसीसीच्या एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

एनसीसीच्या एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Next

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे व प्रशासकीय अधिकारी कर्नल विनय बाली यांच्या उपस्थित झाले. याप्रसंगी एस.एम. लिकेंद्र सिंघ, सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्राजक्ता भंडारी, भरत डगळे, डॉ.एम.एस. जाधव, भरत होळकर, सीटीओ शांता गडगे, शैलेजा, पीआय स्टाफ व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

झेंडे यांनी शिबिराची शिस्त, कोरोना पार्श्‍वभूमीवर घ्यावयाची खबरदारी, परिसर स्वच्छता, पर्यावरण, समाजसेवा, सामाजिक जागृती, एनसीसी छात्रांची जबाबदारी, एनसीसी प्रमाणपत्रांचे महत्त्व, परीक्षेची तयारी अशा अनेक विषयांवर शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.

एनसीसी ‘बी’ व ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षांना पात्र होण्यासाठी द्वितीय व तृतीय वर्षांच्या सर्व छात्रांनी हे प्रशिक्षण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर कॉलेज, न्यू आर्ट्स महाविद्यालय नगर व पारनेर, बाबूजी आव्हाड कॉलेज पाथर्डी, टाकळी डोकेश्‍वर महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचे छात्र या शिबिरात सहभागी आहेत.

प्रशिक्षण शिबिरादरम्यान ड्रील, शस्त्र प्रशिक्षण, फिल्ड क्राफ्ट बॅटल क्राफ्ट, नकाशा वाचन, एनसीसी संघटन, कोरोना, पर्यावरण जागृती, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता, सामाजिक जागृती व सामाजिक विकास, एनसीसी व स्त्री सबलीकरण आदी विषयांचे ज्ञान छात्रसैनिकांना देण्यात येणार आहे.

--------

फोटो - २४ एनसीसी १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे पाच दिवशीय एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिर अहमदनगर कॉलेज मैदानावर सुरू झाले आहे.

Web Title: Commencement of NCC's joint annual training camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.