शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

पालावरच ऊस तोडणी मजुरांच्या मुलांचा बाल दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 2:04 PM

एकीकडे विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात बाल दिन साजरा झाला, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडात दाखल झालेल्या तोडणी मजुरांच्या मुलांचा बाल दिन पालावर व उसाच्या फडातच साजरा झाला.

बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : एकीकडे विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात बाल दिन साजरा झाला, तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या फडात दाखल झालेल्या तोडणी मजुरांच्या मुलांचा बाल दिन पालावर व उसाच्या फडातच साजरा झाला. त्यातील अनेक जण शिक्षणापासूनही वंचित आहेत. तर काहीजण शाळेत जाणारीही होती.गेल्या वर्षी पाऊस कमी पडला परिणामी उसाच्या फडांचा कोळसा झाला. त्यामुळे ५० टक्के साखर कारखाने बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत श्रीगोंद्यातील साईकृपा (ढवळगाव) व पुणे जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यंदा पाऊस बरा होता. पण परतीच्या पावसाने तोंडाशी आलेला सोन्यासारखा घास हिरावून नेला. ते दु:ख, वेदना घेऊन मराठवाडा, खानदेशमधील हजारो ऊस तोडणी मजूर फडात दाखल झाले आहेत. मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे काही कुटुंब ऊस तोडणीसाठी आली आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची लहानमोठी मुलेही आहेत. ५ ते १५ वयोगटातील शाळकरी मुले आणि छोटी-छोटी बालकेही आहेत. गुरुवारी सर्वत्र बाल दिन उत्साहात साजरा होत असताना ऊस तोडणी मजुरांची मुले त्यांच्या छोट्या पालाभोवतीच खेळातांना दिसत होते.यंदा गावाकडे सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरीची पिके जोमात होती. पण, परतीच्या पावसाने सर्व वाहून नेले आणि मोकळ्या हाताने उसाच्या फडात आलो, असे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील ऊसतोडणी कामगार वामन जगताप यांनी सांगितले.मी आमच्या गावातील शाळेत सातवीत शिक्षण घेत आहे. आई-वडील ऊस तोडणीसाठी आले. घरी कोणीच नसल्याने मलाही शाळा सोडून त्यांच्याबरोबर यावे लागले. मला शाळा शिकण्याची इच्छा आहे, ऊसतोड मजुराची मुलगी पूजा वाघ यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरStudentविद्यार्थी