मीटर रिडींगमध्ये फेरफार करुन साडेपाच लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 08:25 PM2017-09-21T20:25:32+5:302017-09-21T20:25:51+5:30

Change the meter reading to five and a half pounds | मीटर रिडींगमध्ये फेरफार करुन साडेपाच लाखाला गंडा

मीटर रिडींगमध्ये फेरफार करुन साडेपाच लाखाला गंडा

googlenewsNext

श्रीगोंदा : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या वाणिज्य व घरगुती रिडींगमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची ५ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील योगेश मेकॉल यांच्याविरोधात बेलवंडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बेलवंडी वीज वितरण कंपनीच्या अखत्यारित बेलवंडी, कोळगाव, ढवळगाव, मढेवडगाव, पारगाव व इतर गावे येतात. कंपनी अंतर्गत या गावामधील घरगुती व वाणिज्य ग्राहक येतात. योगेश मेकॉल व त्यांच्या इतर सहकाºयांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ४४ हजार ७५५ इतके कमी रिडींग दाखवून ५ लाख ४४ हजार ८८८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. वीज वितरण कंपनीने याबाबत अधिक तपासणी केली असता ही तफावत उघडकीस आली.
वीज वितरण कंपनीच्या लेखापाल मीरा वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी साबळे करीत आहेत.

Web Title: Change the meter reading to five and a half pounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.