कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माणुसकीच्या शृंखला गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:31+5:302021-05-23T04:19:31+5:30

कोणी गावाकडील कोविड सेंटरला औषधे पाठवतात, तर आर्थिक मदत करत आहे. गावात भावकीत वा मित्राच्या कुटुंबाच्या मदतीला धावून येत ...

The chain of humanity darkens in the second wave of the corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माणुसकीच्या शृंखला गडद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माणुसकीच्या शृंखला गडद

Next

कोणी गावाकडील कोविड सेंटरला औषधे पाठवतात, तर आर्थिक मदत करत आहे. गावात भावकीत वा मित्राच्या कुटुंबाच्या मदतीला धावून येत मानसिक आधार देत आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचा आकडा वाढला असला तरी खेडोपाडी आणि शहरात माणुसकीच्या शृंखला अधिक गडद घट्ट होताना दिसत आहे. कोविड रुग्णाच्या मदतीला अख्खा गाव, भावकी, मैत्री धावून येत असून कुणी बेड मिळवून देण्यासाठी तर कोणी औषधे इंजेक्शन मिळवून देण्यासाठी धावताना दिसतोय. कोविड सेंटरसाठी लोकवर्गणीतून अन्नछत्र भंडारा सुरू झाले आहेत. पदोपदी माणुसकी सजग झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काही ठिकाणी कोरोना तिसरी लाट राखण्याची तयारी सुरू झाली आहे. तालुक्यातील म्हाळादेवी येथील गावकरी यांनी खंडोबा यात्रेसाठी जमा होणारी उंबरा वर्गणी सुगाव कोविड केंद्रास औषधांसाठी दिली. टाळकी येथे कोरोनाने दगावलेल्या मित्राच्या कुटुंबाच्या मदतीला मैत्रीचा याराना दिसला दोन लाख रुपये मदत जमा झाली. इंदोरीतदेखील दहावीच्या इयत्तेतील मैत्री मित्रासाठी सजग झालेली दिसली. ठाणे मुंबई येथील अविष्यत मैत्री ग्रुपने तालुक्यातील कोविड सेंटरसाठी सव्वाचार लाख रुपयांची औषधे पाठविली. तालुक्यातील नाशिक येथे कार्यरत डाॅक्टरने मिनी व्हेंटिलेटर दिले. मुंबईतील प्रेम-स्नेह परिवाराचा कोविड सेंटरला मदतीचा हात मिळाला आहे. मुंबई, संगमनेर, पुणे, नाशिक, हैदराबाद ते अमेरिकत, इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या मित्रपरिवाराने आर्थिक मदत केली. त्याच माध्यमातून सुगाव येथील कोविड सेंटरच्या मदतीसाठी ५० गाद्या, उशा, आणि बेडशीट असे सेट उपलब्ध करून दिले. समशेरपूर येथे उभारल्या गेलेल्या कोविड केअर सेंटर साठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला गेला. खानापूर येथील कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलिंडर पोहोच केले. सरकारी कोविड सेंटर खानापूर, राजूर, कोतूळ, समशेरपूर, ब्राह्मणवाडा येथे ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे.

..............

शिक्षकांच्या पुढाकाराने कोविड सेंटर

शिक्षकांच्या पुढाकाराने सुगाव येथे ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभे राहिले. समशेरपूर, राजूर, कोतुळ, शेंडी, कळस आदी ठिकाणी लोकसहभागातून कोविड सेंटर, तर गावोगावी ग्रामरक्षक समित्या व गावकरी यांच्या वर्गणीतून कोविड विलगीकरण कक्ष सुरू झाले आहे. या कोविड सेंटर व विलगीकरण कक्षांना नोकरीनिमित्त शहरात गेलेले चाकरमानी गावकरी सढळ हातांनी मदत करताना दिसत आहेत.

Web Title: The chain of humanity darkens in the second wave of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.