तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:19+5:302021-05-16T04:20:19+5:30

घारगाव ( अहमदनगर) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संगमनेर ...

The car was placed on the body of a police inspector at the checkpoint | तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार

तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार

Next

घारगाव ( अहमदनगर) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे पोलीस वाहनांची तपासणी पोलीस करत होते. त्यावेळी नाशिकहून पुण्याकडे कार घेऊन चाललेल्या चालकाने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातली. यात सुदैवाने ते बचावले. मात्र, पायावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

सुनील पाटील असे जखमी झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संचारबंदीमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर आंबी-खालसा शिवारात घारगाव पोलिसांकडून नेहमीप्रमाणे शनिवारीही नाकाबंदी करण्यात आली होती. सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाशिककडून आलेली कार (एम.एच १२, आर. वाय. ८५६८) पुण्याकडे जात होती. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी चालकाला कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने थेट पाटील यांच्या अंगावर कार घातली. यात पाटील यांच्या डाव्या पायाच्या पंज्यावरून कारचे चाक गेले. त्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांना कार व चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: The car was placed on the body of a police inspector at the checkpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.