शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विडी कामगारांचा कैवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 3:09 PM

कॉम्रेड राम रत्नाकर आणि कम्युनिस्ट चळवळ यांचे नाते अतूट आहे. विडी कामगारांच्या उद्धारासाठी त्यांनी त्यांचे जीवन चळवळीच्या माध्यमातून पणाला लावले. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाची त्यांनी आयुष्यभर वकिली केली. त्यांचे घर म्हणजे एक कार्यशाळाच होती. अहमदनगर जिल्हा साम्यवादी विचारांचा बालेकिल्ला बनविणाºया अनेक रत्नांमध्ये ‘राम रत्नाकर’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल़

अहमदनगर : कम्युनिस्टांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आता कमी होत असली तरी पूर्वी कधीकाळी हा संपूर्ण जिल्हा लाल रंगात रंगलेला होता. महाराष्टÑातील अनेक चळवळी अहमदनगरमधून सुरू झाल्या. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर लढे उभारले गेले. यापैकी अनेक लढ्याला यशही मिळाले. अहमदनगर शहरामध्ये पूर्वी विडी उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत होता. या उद्योगामध्ये पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता. त्यांच्यामध्ये आज दिसत असलेली सामाजिक सुधारणा, भरभराट ही कॉम्रेड राम रत्नाकर यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच दिसत आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये़अ‍ॅड. कॉ. रामचंद्र कृष्णाजी रत्नाकर हे कोºहाळा (ता. कोपरगाव) येथील मूळ रहिवासी. सात भाऊ आणि दोन बहिणी असणाºया शेतकरी कुटुंबातील रत्नाकर हे वडिलांच्या निधनानंतर अहमदनगरला मामांकडे आले. अहमदनगर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे  शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात एल. एल. बी.चे शिक्षण घेतले. त्यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही ते जात होते. नगर शहरातील नामवंत डॉक्टर क्षीरसागर हे त्याकाळी साम्यवादी विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांनी रत्नाकर यांना मार्क्स, लेनिन यांची पुस्तके वाचायला दिली. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि ते साम्यवादी विचारांकडे झुकले. संयुक्त महाराष्टÑ चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.  त्यानंतर १९६० मध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.१९६१ मध्ये लाल बावटा कामगार युनियनची त्यांनी स्थापना केली. ते अहमदनगरचे अध्यक्ष बनले. १९६३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टÑातील असंघटित कामगारांचा संप झाला. महाराष्टÑ राज्य विडी, सिगारेट, तंबाखू वर्कर्स् फेडरेशनची धुरा त्यांनी स्वत:कडे घेतली. कामगारांच्या विविध प्रश्नात लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शहर, जिल्हा व राज्य कौन्सिलवर त्यांनी काम केले. कामगार विषयक आपल्या कार्यकर्तृत्वाने उभ्या महाराष्ट्राला ते परिचित झाले. अहमदनगर शहरात विडी कामगारांना राहण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा श्रमिकनगर वसाहतीची कॉ. सुरेश संत यांच्या सहकार्याने त्यांनी स्थापना केली. विडी कामगारांनी ४५० रुपये सभासद फी, १ हजार रुपये डेव्हलपमेंट फी व १४ हजार ५०० रुपये महाराष्टÑ हौसिंग फायनान्सचे कर्ज एवढ्या कमी रकमेत ६२० स्क्वेअर फूट जागेमध्ये २२० फूट बांधकाम केलेली घरे कामगारांना मिळाली. त्यासाठी रत्नाकर यांनी मोठे परिश्रम घेतले.अहमदनगर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी ते दोनदा निवडून आले. शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांनी काहीकाळ काम केले. विडी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळा व शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या.शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे वकील म्हणून ते शहरात उत्तम वकिली करीत होते. शहरातील त्यांचे घर म्हणजे सर्वपक्षीय  कार्यकर्त्यांची कार्यशाळाच होती. विविध पक्षाचे पुढारी घरी जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे. पक्षाची विविध अधिवेशने, मोठ्या नेत्यांच्या सभा त्यांनी आयोजित केल्या होत्या. मुळा चारी, निळवंडे धरण, जायकवाडी धरणग्रस्त लढ्यामध्ये ते सातत्याने सहभागी व्हायचे. अहमदनगर शहराची जीवनदायी ठरलेल्या मुळा धरणातून थेट पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी शहर बंदची हाक १९७२ मध्ये त्यांनीच दिली होती.विडी कामगारांना किमान वेतन मिळावे, फंड मिळावा, ग्रॅच्युईटी मिळावी, महिलांना बाळंतपणाची सुट्टी मिळावी यासाठीचे लढे उभारून त्यांनी विडी कामगारांना न्याय मिळवून दिला. कष्टकरी महिलांना पेन्शन मिळावी, ही त्यांची मागणी मान्य झालीच. शिवाय विडी कामगार महिला, विधवा महिला असल्यास तिच्या मुलीच्या विवाहासाठी सानुग्रह अनुदान त्यांनी सुरू करायला भाग पाडले. कोणत्याही प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हाक दिल्यास ते सर्वात पुढे असायचे. कोणी समोर असो नसो. त्यांचे भाषण सुरू होई आणि लोक जमत, हा अनुभव अनेकांनी घेतला. कामगारांना संघटित करून त्यांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देणे, त्यांची सोडवणूक करण्यासाठी ते प्रयत्न करायचे. प्रश्नाची तड लावल्याशिवाय ते थांबत नसत.अहमदनगर जिल्ह्यात त्यांचे समवेत कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. बाळासाहेब नागवडे, कॉ. नामदेव आव्हाड, कॉ. वकीलराव लंघे, कॉ. बाबासाहेब ठुबे, कॉ. बी. के. देशमुख हे त्यांचे पक्षातील सहकारी होते तर मित्र पक्षाचे कॉ. भास्करराव जाधव, कॉ. मधुकर कात्रे, बापूसाहेब भापकर, कॉ. एकनाथ भागवत, दिनकर नलावडे, राजाभाऊ कुलंगे, रामभाऊ निसळ, साथी राम दसरे, नानासाहेब नानल, अ‍ॅड. ना. ज. पाऊलबुद्धे, मल्लेश्याम येमूल, कॉ. चंद्रभान आठरे पाटील हे त्यांचे सहकारी होते. रत्नाकर यांनी पक्षाचा आदेश मानून दोन वेळा विधानसभा तर एक वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती. पक्षाचे मोठे पुढारी कॉ. सी. राजेश्वरराव, कॉ. इंद्रजीत गुप्ता यांच्या सभांचे त्यांनी आयोजन केले होते. रत्नाकर हे कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी असले तरी सर्व पक्ष संघटनेतील मान्यवर त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे. 

लेखक - कॉ. शंकर न्यायपेल्ली (सहकार्य : अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर