Bus-container accident near Bypass on Kalyan highway: Death of teenager, four passengers injured | अहमदनगर -कल्याण महामार्गावरील बायपासजवळ बस-कंटेनरचा अपघात : तरूणीचा मृत्यू, चार प्रवासी जखमी
अहमदनगर -कल्याण महामार्गावरील बायपासजवळ बस-कंटेनरचा अपघात : तरूणीचा मृत्यू, चार प्रवासी जखमी

अहमदनगर -कल्याण रोडवरील बायपासजवळ बस-कंटेनरचा अपघात : तरूणीचा मृत्यू, चार प्रवासी जखमी 
अहमदनगर : अहमदनगर- कल्याण महामार्गावरील नेप्तीजवळील बायपास जवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. सुचिता परमेश्वर बडे(वय-२१, रा.सारसनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. 
पारनेरहून नगरच्या दिशेने (एम.एच. ४०, एन-८७५६) ही बस जात होती. बायपास ओलंडून बस जात असतानाच पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणा-या कंटेनर बसला पाठीमागच्या बाजून धडक दिली. या धडकेमुळे बस पलटी झाली. या अपघातामध्ये मृत्यू पावलेली तरुणी नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी होती. 
पावणे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी तोफखाना पोलिस दाखल झाले आहेत. 


Web Title: Bus-container accident near Bypass on Kalyan highway: Death of teenager, four passengers injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.