शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

काळे कपडे घातलेल्यांना मोदींच्या सभेला नो-एन्ट्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:03 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज नगर येथे झालेल्या प्रचार सभेत काळे कपडे घातलेल्या महिला, पुरूषांना प्रवेश नाकारण्यात आला

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज नगर येथे झालेल्या प्रचार सभेत काळे कपडे घातलेल्या महिला, पुरूषांना प्रवेश नाकारण्यात आला. बुरखाधारी महिला, तसेच काळ्या ओढण्या असलेल्या महिलांनाही सभेपासून रोखण्यात आले. े पाण्याच्या बाटल्याही गेटवरच काढून घेण्यात येत होत्या. अहमदनगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सकाळी अकरा वाजता सावेडीतील संत निरंकारी भवनाजवळील मैदानात  सभा आयोजित करण्यात आली होती.  त्या सभेला जिल्हाभरातून लोक आले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच सभास्थळाकडे नागरिक जमा होत होते. सभास्थळी महिला व पुरूषांसाठी एकत्रित ३० गेटमधून प्रवेश दिला जात होता. परंतु यावेळी पोलिसांकडून लोकांची कसून तपासणी केली जात होती. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त प्रवेशद्वारावर होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांनी पाण्याच्या बाटल्या बरोबर आणल्या होत्या. परंतु पोलिसांनी या बाटल्या गेटवरच काढून घेतल्या. मोकळी असो वा भरलेली पाण्याची बाटली सभामंडपात न्यायची नाही, अशा सक्त सूचना असल्याने सर्व बाटल्या गेटवरच काढून घेण्यात आल्या. परिणामी पाण्याच्या बाटल्यांचा भलामोठा खच गेटवर जमा झाला.  काळे कपडे घातलेल्या व्यक्तींनाही पोलीस प्रवेश नाकारत होते. बुरखाधारी महिलांना चक्क मागे जाण्याची वेळ आली. ज्या मुली, महिलांनी काळी ओढणी परिधाण केली होती, त्यांना ओढणी गेटवरच काढून ठेवण्याचे पोलीस सांगत होते. यात काही महिलांनी ओढणी काढूनही ठेवल्या. परंतु अनेकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. काळे कपडे नेमके का नाकारले जात होते, हे अनेकांना समजले नाही. पोलिसांनीही त्याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकahmednagar-pcअहमदनगरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019