शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

Breaking : माजी मंत्री दिलीप गांधी यांचे निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 7:20 AM

Breaking : गांधी यांनी तीनवेळा नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार बनून प्रतिनिधित्व केले आहे.

अहमदनगर - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली, ते 69 वर्षांचे होते. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार रोजी नगर जिल्ह्यातच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. मृत्यूसमयी पत्नी, दोन्ही मुले त्यांच्यासमवेत दिल्लीतच होती.

गांधी यांनी तीनवेळा नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार बनून प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतच होते, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष,  भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षाची पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. 1985 ते 1999 पर्यंत अहमदनगर नगरपालिकाचे उपाध्‍यक्ष म्हणून काम पाहिले.

1999 में पहील्यांदा  लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. या कार्रयकाळात  2000 ते 2004 ग्रामीण विकास समिती आणि 2000 ते 2003 पर्यंत वित्‍त मंत्रालयाच्या सल्लागार समितिचे सदस्‍य होते. 2009 मध्ये दुसऱ्यांदा ते लोकसभेत निवडून गेले.तर २०१४ मध्ये तिस-यांदा लोकसभेवर निवडून आले

टॅग्स :Member of parliamentखासदारDilip Gandhiखा. दिलीप गांधीAhmednagarअहमदनगरDeathमृत्यू