सडे गावात 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह; चार हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:28 AM2021-01-27T11:28:16+5:302021-01-27T11:29:59+5:30

सडे (ता. राहुरी) येथील श्लोक पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह आढळल्या. भोपाळ येथील प्रयोगशाळेतून तसा अहवाल आला आहे.

'Bird flu' positive in Sade village; Planted disposal of four thousand hens | सडे गावात 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह; चार हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट

सडे गावात 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह; चार हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट

Next

राहुरी : सडे (ता. राहुरी) येथील श्लोक पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह आढळल्या. भोपाळ येथील प्रयोगशाळेतून तसा अहवाल आला आहे.

    जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंगळवारी  रात्री अकरा वाजेपर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाने पोल्ट्रीमधील चार हजार गावरान कोंबड्यांना मारुन, सर्व कोंबड्या, त्यांचे खाद्य व विष्ठा यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली. पोल्ट्रीफार्म व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

सडे येथे मागील आठवड्यात श्लोक पोल्ट्री फार्ममधील चार-पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सोमवारी (ता. २५) रात्री त्यांचा अहवाल 'बर्ड फ्ल्यू' पॉझिटिव्ह आला.

सडे येथे कोंबड्यांची मरतूक आढळल्यानंतर पोल्ट्री फार्मच्या सभोवताली एक किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या घरगुती कोंबड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार जणांचे एक पथक असे ३२ जणांचे आठ पथकांनी पोलीस बंदोबस्तात घरोघरी जाऊन, कोंबड्यांची विल्हेवाट लावली. पोल्ट्री फार्मपासून दहा किलो मीटर परिसरातील कोंबड्यांची वाहतूक, विक्री व खरेदीवर ९० दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे.

राहुरीच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष पालवे म्हणाले, कुक्कुट पालन फार्ममधील कोंबड्या अनैसर्गिक मरतूक होत असल्याचे आढळल्यास, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. जेणेकरून रोगाचा प्रसार थांबवता येईल. 'बर्ड फ्ल्यू' अजूनही सीमित स्वरूपात आहे. 'बर्ड फ्ल्यू' मुळे मनुष्यहानी झाल्याचे आजपर्यंत भारतात आढळलेले नाही. त्यामुळे, सद्यस्थितीत अंडी व चिकन खाण्यासाठी कोणताही धोका नाही

 

Web Title: 'Bird flu' positive in Sade village; Planted disposal of four thousand hens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.