शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलला भूमिपूजन, गोविंदगिरी महाराजांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 2:41 PM

Ram Mandir : श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्ताची 4 एप्रिल रोजी अयोध्येत बैठक होईल. त्यात 30 एप्रिल रोजी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब होईल.

अहमदनगर - अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलरोजी भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती गोविंदगिरी महाराज यांनी आज अहमदनगर येथे दिली. अयोध्येतील वादग्रस्त भूमिखाली राम मंदिरच असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. 

गोविंदगिरी महाराज म्हणाले, ''श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्ताची 4 एप्रिल रोजी अयोध्येत बैठक होईल. त्यात 30 एप्रिल रोजी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रम निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब होईल. संपूर्ण मंदिर हे पाषाणाचे बनविले जाणार आहे. त्यासाठी किती खर्च येईल हे चार एप्रिल रोजी आकडा ठरेल. मंदिर भव्य असेल. ते केवळ मंदिर नसेल तर जगाची सांस्कृतिक व संस्काराची राजधानी होईल. प्रत्येक राज्याचे भवन तिथे ऊभारले जावे, असाही प्रयत्न असेल.'''राम मंदिरामधून प्रत्येकाला जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. तसेच या मंदिरात रामलल्लाच्या जुन्या मूर्तीसह नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. राम मंदिर ट्रस्टकडून अयोध्येत खाते उघडण्यात येणार असून, त्यात ऑनलाईन निधी संकलन होणार आहे,' असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.दरम्यान, '30 एप्रिलरोजी राम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान व संघाचे सरसंघचालक उपस्थित राहतील. राम मंदिराला सर्वात आधी शिवसेनेने नव्हे तर तिरुपती देवस्थानने शंभर कोटी घोषित केले आहेत. त्यांनी निधी दिला, त्याचे स्वागतच आहे. राम मंदिराचा आधीचा आराखडा हा जुना आहे. त्यात मंदिराच्या भव्यतेनुसार बदल करण्यात येणार आहेत.' असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याAhmednagarअहमदनगर