सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो-अशोकानंद महाराज कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:25 AM2020-07-31T10:25:12+5:302020-07-31T10:26:31+5:30

संगती ही खूप महत्वाची असते.  तुम्ही कोणाच्या संगतीत राहता यावरून तुमचे चारित्र्य , व्यक्तिमत्व ठरत असते. संगती, विसगंती कुसंगती आणि संतसंगती असे साधारणपणे संगतीचे प्रकार पडतात. सर्वसामान्यपणे ज्या समाजात किंवा लोकामध्ये राहावे लागते त्या संगतीला सामान्यत: संगती म्हणतात. त्या संगतीचा सुद्धा माणसाच्या चारित्र्यावर परिणाम होत असतो. याच संगतीमध्ये कधी कधी आपल्याला न आवडणा-या लोकांची संगती घडत असते. आपले विचार वेगळे असतात व अगदी त्याच्या विरुध्द विचार समोरच्या व्यक्तीचे असतात. याला विसंगती म्हणतात. उदा. प्रल्हाद हा पारमार्थिक होता तर त्याचा पिता मात्र पारमार्थिक नव्हता, ही विसंगती होती. अशा वेळेला ही विसंगती टाळता आली तर चांगलेच पण ! प्रल्हाद जसा पित्याची संगती टाळू शकत नव्हता आणि स्वत:चा स्वभाव सुद्धा बदलू शकत नव्हता. अशा वेळेला विसंगतीची उपेक्षा करावी हेच श्रेयस्कर.

-Asokananda Maharaj Kardile | सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो-अशोकानंद महाराज कर्डिले

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो-अशोकानंद महाराज कर्डिले

googlenewsNext

भज गोविन्दम – ||११||

 

 सतसंगत्वे निसंगत्वम 

निसंगत्वे निर्मोहत्वम |

निर्मोहत्वे निश्चलत्वम 

निश्चलत्वे जीवन्मुक्ति : ||

 

संगती ही खूप महत्वाची असते.  तुम्ही कोणाच्या संगतीत राहता यावरून तुमचे चारित्र्य , व्यक्तिमत्व ठरत असते. संगती, विसगंती कुसंगती आणि संतसंगती असे साधारणपणे संगतीचे प्रकार पडतात. सर्वसामान्यपणे ज्या समाजात किंवा लोकामध्ये राहावे लागते त्या संगतीला सामान्यत: संगती म्हणतात. त्या संगतीचा सुद्धा माणसाच्या चारित्र्यावर परिणाम होत असतो. याच संगतीमध्ये कधी कधी आपल्याला न आवडणा-या लोकांची संगती घडत असते. आपले विचार वेगळे असतात व अगदी त्याच्या विरुध्द विचार समोरच्या व्यक्तीचे असतात. याला विसंगती म्हणतात. उदा. प्रल्हाद हा पारमार्थिक होता तर त्याचा पिता मात्र पारमार्थिक नव्हता, ही विसंगती होती. अशा वेळेला ही विसंगती टाळता आली तर चांगलेच पण ! प्रल्हाद जसा पित्याची संगती टाळू शकत नव्हता आणि स्वत:चा स्वभाव सुद्धा बदलू शकत नव्हता. अशा वेळेला विसंगतीची उपेक्षा करावी हेच श्रेयस्कर.

 

 कुसंगती हा प्रकार फार विचित्र आहे. या संगतीमध्ये निश्चितपणे  अध:पतन ठरलेले असते. म्हणूनच श्री नारद महर्षी म्हतात ,” कुसंग सर्वथा त्याज्य |” कुसंग कधीही करूच नये. तो संग  टाळलाच पाहिजे. कुसंगतीने आपल्याला आघात झाल्याशिवाय राहत नाही. एक दृष्टांत आहे. एक राजहंस होता. जो फक्त मोत्याचा चारा खात असे व मानसरोवरात राहत असे.पण चुकून त्याची मैत्री एका कावळ्याबरोबर  झाली. कावळा म्हटले की सर्व दृष्टीने वाईटच. त्याचे राहणे,खाणे सर्वच विचित्र. तो काय खाईल हे सांगता येणार नाही पण या दोघांची मैत्री झाली हे खरे. एकदा काय झाले दोघेही आकाशमार्गाने उडत चालले होते व एका जंगलात उंच मोठ्या झाडावर येऊन बसले. नेमके त्याच वेळी त्या देशाचा राजा शिकार करीत तेथे आला. तो खूप थकला होता. म्हणून त्याच झाडाखाली येऊन झोपला. थोड्या वेळाने सूर्य वर आला आणि त्याचे किरणे राजाच्या डोक्यावर पडू लागले. राजहंसाला वाटले आपल्या देशाचा राजा आहे, थकलेला आहे. या उन्हामुळे त्याची झोप मोडेल म्हणून त्या हंसाने आपले दोन्ही पंख पसरवून ते किरणे आपल्या पंखावर घेऊन राजाच्या डोक्यावर सावली धरली. तेवढ्यात तो कावळा त्याच फांदीवर येऊन बसला आणि राजच्या डोक्यावर विष्ठा टाकली व उडून गेला.  राजाची  झोप मोडली व त्याने वर बघितले तर त्याला नेमका राजहंस दिसला. राजाला राग आला आणि त्याने त्या हंसाला बाण मारला व तो राजहंस मारला गेला. तात्पर्य कुसंगती काही कामाची नाही. ती कुसंगती टाळलीच पाहिजे. व्यसनी माणसाची संगती म्हणजे कुसंगती अशी संगती कामाची नाही. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात "ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला | कुसंगे नाडला साधू तैसा|| " ढेकणाची संगती जर  झाली तर कणखर असा हिरा सुद्धा भंग पावतो. तसे कुसंगतीने साधूचे सुद्धा पतन होऊ शकते. म्हणून कुसंगती निश्चितपणे त्यागली पाहिजे. 

 

केकावलीमध्ये मोरोपंत म्हणतात “सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो ||

 

सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो, वियोग घडता रडो, 

मन भगवतचरित्री जडो || “

 

सुसंगती म्हणजेच संतसंगती सर्वात महत्वाची व श्रेयस्कर. आचार्य या श्लोकात हेच सांगतात की संत संग महत्वाचा आहे. या संगतीनेच निसंगत्व प्राप्त होते. आपल्या सर्व संतानी सुद्धा भगवंताजवळ हेच मागितले आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, 

“ न लगे धन संपदा |संत संग देई सदा||” माउली ज्ञानोबाराय हरिपाठात म्हणतात ,”संताचे संगती मनोमार्ग गती | आकळावा श्रीपती येणे पंथे ||”  संत एकनाथ महाराज म्हणतात “ हरीप्रप्तीसी उपाय | धरावे संतांचे ते पाय ||” तात्पर्य सर्व संताचे म्हणणे सारखेच आहे कारण संत हे निष्काम, निरपेक्ष, व लाभाविण प्रीती करणारे असतात. त्यांच्या अंत:करणात कसलीही अपेक्षा, मोह नसतो म्हणून अशा संतांचे संगतीत आपण गेलो तर आपल्यालाहि निर्मोहत्व, निसंगत्व प्राप्त होते. कोणताही संग चांगला असतोच असे नाही. फक्त संतसंगच हितकारक असतो. त्यांच्या संगतीत आपणही निसंग होतो. सर्व दुख: हे संगाने होत असते. संगाने तादात्म्य जडत असते व तादात्म्य जडले कि दुख: होतेच. माझे माझे म्हंटले कि दुख: अपोआप येते,व निसंगत्व असले म्हणजे दुखाचा संबंध येत नाही. निसंगत्वाने  कोणाचाही मोह राहत नाही आणि मोह नसला म्हणजे खेद राहत नाही. अर्जुनाला मोह झाला म्हणूनच त्याला श्रीकृष्णाने श्रीमदभागवतगीता सांगितली व मोह नष्ट केला. स्वत: अर्जुनच म्हणला “नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत। स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।१८-७३ ।।  तात्पर्य मोह नष्ट झाला म्हणजे दुख: राहत नाही.

 

 ज्याला मोह नाही तो निश्चल बुद्धीचा असतो. त्याच्या बुद्धीमध्ये चंचलत्व राहत नाही. अंत:कारण चंचल झाले की विक्षेप सुरु होतो व विक्षेप आला कि अन्यथाज्ञान येते. म्हणजेच विपरीत ज्ञान येते व त्यामुळेच दुख: पदरात पडते. गीतेमधे  साहव्या अध्यायात भगवान म्हणतात ,” चञ्चलं ही मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्। तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्।।६-३४ ।।“

 

स्थिरअंत:करणात आनंद प्राप्त होतो. निश्चल मन हे नेहमी आनंदी असते. ज्याचे मन निश्चल झाले आहे तोच जीवन्मुक्त असतो, असे आचार्यांना म्हणायचे आहे. ज्याला देहाचे बाधित भान असते तो जीवन्मुक्त असतो व असाच महात्मा जगाला तारीत असतो. समाजाच्या उपयोगी हाच महात्मा येत असतो. म्हणून आचार्यांनी या श्लोकात फार सुंदर क्रम संगिताला तों म्हणजे सत्संगाने निसंगात्व, निसंगत्वाने निर्मोहत्व, निर्मोहात्वाने निश्चलत्व  व निश्चलत्वाने जीवन्मुक्ति.

वरील पद्धतीने मानवी जीवन झाले तर ते एक साधुचे  जीवन व आनंदी जीवन ठरते.

- भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले

गुरुकुल भागाताश्रम , चिचोंडी (पाटील) ता. नगर

मोब. ९४२२२२०६०३

ReplyForward

  

Web Title: -Asokananda Maharaj Kardile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.