कोपरगावात अटीतटीच्या लढतीत आशुतोष काळेंची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 05:14 PM2019-10-25T17:14:31+5:302019-10-25T17:33:48+5:30

 विधानसभा निवडणुकीत खºया अर्थाने  ‘कांटे की टक्कर’ पाहावयास मिळाली. भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व आशुतोष काळे यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंतच्या चुरशीच्या लढाईत आशुतोष काळे यांनी अवघ्या ८२२ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला.

Ashutosh blacks in betting battle in Kopargaon | कोपरगावात अटीतटीच्या लढतीत आशुतोष काळेंची बाजी

कोपरगावात अटीतटीच्या लढतीत आशुतोष काळेंची बाजी

Next

कोपरगाव विधानसभा निवडणूक विश्लेषण : रोहित टेके । 
कोपरगाव :  विधानसभा निवडणुकीत ख-या अर्थाने  ‘कांटे की टक्कर’ पाहावयास मिळाली. भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व आशुतोष काळे यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंतच्या चुरशीच्या लढाईत आशुतोष काळे यांनी अवघ्या ८२२ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. 
कोपरगाव विधानसभा मतदार संघ जो संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा असतो.  पारंपरिक लढत काळे व कोल्हे यांच्यात असते. गेल्या खेपेला स्नेहलता कोल्हे भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. यंदा त्यांचा मुकाबला राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्याशी होता. कोपरगाव विधानसभा मतदार संघ गत पाच वर्षापासून रस्ते व पाणी या विषयाभोवती फिरत होता. विद्यमान आमदारांना दोनही प्रश्न पाच वर्षात निकाली काढता आला नसल्याने व काळे यांनी सत्ता नसताना देखील पाणी व रस्त्याच्या प्रश्नांमध्ये रस दाखवत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे जनतेने भविष्यात काळे दोन्ही प्रश्न निकाली लावतील या आशेने ख-या अर्थाने तिरंगी लढत असून देखील काळे यांना निसटता विजय मिळाला. चुरशीच्या लढाईत मतमोजणीच्या फे-या दरम्यान काळे व कोल्हे यांच्या मताधिक्यात फार कमी फरक राहिला. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या आजवरच्या लढाईत, अशी लढाई पहिल्यांदाच झाली.
परजणेंमुळे कोल्हेंचा पराभव ? 
४शहरात अपक्ष उमेदवार विजय वहाडणे हे भाजपच्या मतांचे वाटेदार ठरले. तर दुसरे अपक्ष उमेदवार असलेले राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांचादेखील शहरासह ग्रामीण भागात कोल्हे यांची मते खाण्यात मोठा वाटा राहिला. तसेच कोल्हे यांच्यावर स्थानिक पातळीवर असलेली नाराजी इत्यादी कारणामुळे कोल्हे यांचा पराभव तर काळे यांना विजय प्राप्त झाला .
शहीद जवानांना विजय समर्पित
  माझा विजय हा वीरगती प्राप्त झालेल्या तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शहीद जवान सुनील वलटे यांना समर्पित करत आहे.  मतदार व कार्यकर्ते यांनी मनापासून काम केले. कोपरगाव तालुक्याचा थांबलेला विकास रथ झपाट्याने पुढे नेऊ. कोपरगाव तालुक्यातील पाण्याचा व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. 
     

Web Title: Ashutosh blacks in betting battle in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.