सोमवंशी यांची न्यू आर्ट्सच्या अकॅडमिक कौन्सिलवर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:21+5:302021-06-24T04:16:21+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमरकर यांच्या आदेशाने पुढील तीन वर्षाकरिता ही नियुक्ती ग्राह्य असेल. डाॅ. ...

Appointment of Somvanshi to the Academic Council of New Arts | सोमवंशी यांची न्यू आर्ट्सच्या अकॅडमिक कौन्सिलवर नियुक्ती

सोमवंशी यांची न्यू आर्ट्सच्या अकॅडमिक कौन्सिलवर नियुक्ती

Next

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमरकर यांच्या आदेशाने पुढील तीन वर्षाकरिता ही नियुक्ती ग्राह्य असेल. डाॅ. सोमवंशी हे सध्या पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. अहमदनगर महाविद्यालयात ते प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी विभागाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रजनीश बार्नबस यांच्या हस्ते बुधवारी सोमवंशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सय्यद रजाक, उपप्राचार्य बी. एम. गायकर, डॉ. डी. बी. मोरे व उपप्राचार्य डॉ. ए. वि. नागवडे उपस्थित होते.

------------

फोटो - २३नगर काॅलेज

अहमदनगर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एन. आर. सोमवंशी यांची न्यू आर्ट्सच्या अकॅडमिक कौन्सिलवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रजनीश बार्नबस, उपप्राचार्य डॉ. सय्यद रजाक, उपप्राचार्य बी. एम. गायकर, डॉ. डी. बी. मोरे व उपप्राचार्य डॉ. ए. वि. नागवडे आदी.

Web Title: Appointment of Somvanshi to the Academic Council of New Arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.