जिल्ह्यातील आणखी ०१ जण कोरोनामुक्त, आतापर्यंत ३६ जण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:55 PM2020-05-10T20:55:01+5:302020-05-10T20:55:10+5:30

अहमदनगर- जिल्ह्यातील नेवासा येथील ०१  कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५३ असून त्यापैकी आता १४ जणांवर उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

Another 01 people in the district have been corona free, so far 36 people have become corona free | जिल्ह्यातील आणखी ०१ जण कोरोनामुक्त, आतापर्यंत ३६ जण झाले कोरोनामुक्त

जिल्ह्यातील आणखी ०१ जण कोरोनामुक्त, आतापर्यंत ३६ जण झाले कोरोनामुक्त

Next

अहमदनगर- जिल्ह्यातील नेवासा येथील ०१  कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५३ असून त्यापैकी आता १४ जणांवर उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

नेवासा येथील रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बूथ हॉस्पिटलचा डॉक्टर्स, नर्सेस यांनी रुग्णाला निरोप देऊन आरोग्य चांगले राखण्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या रुग्णानेही त्याच्यावर चांगले उपचार आणि योग्य काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफचे आभार मानले.

आतापर्यंत एकूण १७४५ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६३९ स्त्राव निगेटिव्ह आले तर ५३ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.आता ३६ व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १३ रुग्ण बूथ हॉस्पिटल मध्ये तर ०१ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. कोपरगाव, जामखेड आणि धांदरफळ येथील तिघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या २२ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.  

Web Title: Another 01 people in the district have been corona free, so far 36 people have become corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.