शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
3
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
4
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
5
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
6
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
7
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
8
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
10
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
11
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
12
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
13
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
14
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
15
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
16
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
17
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
18
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
19
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
20
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

पंधरा राज्यात होणार अण्णा हजारे केंद्र

By admin | Published: July 07, 2016 11:10 PM

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर देशभर पुन्हा जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने घेतला

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर देशभर पुन्हा जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने घेतला आहे. त्यासाठी देशभरातील पंधरा राज्यात अण्णा हजारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. गुरूवारी राळेगणसिद्धीत झालेल्या देशभरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हजारे यांनी रामलिला मैदान, जंतरमंतर येथे जनलोकपालसाठी आंदोलन केल्यानंतर देशभरात अण्णांच्या नावाचा महिमा सुरू होता. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही संघटना कार्यरत करून अनेक लोक जोडले होते. मात्र केजरीवाल राजकारणात गेल्यावर त्या संघटनेतील अनेक स्वयंसेवक दूर गेले. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ मध्ये काम करणाऱ्या मात्र राजकारणात नसलेल्या स्वयंसेवकांनी गुरूवारी राळेगणसिध्दीत बैठक घेतली. बैठकीस सुमारे पंधरा राज्यांचे प्रतिनिधी हजर होते. हजारे यांची मागणी असलेल्या जनलोकपालची अंमलबजावणी, ग्रामसभेला कायद्याने अधिकार व निवडणुकांमध्ये पक्षाचे चिन्ह हद्दपार करणे यासाठी लढा देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. तीन महिन्यांत यासाठी प्रत्येक राज्यात अण्णा हजारे केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यातून अण्णांच्या आंदोलनाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवून संघटन उभारले जाणार असल्याचे स्वयंसेवक सुनीललाल यांनी सांगितले. यावेळी संजय पठाडे, अमोल झेंडे, शाम पठाडे, कृष्णमूर्ती (तामिळनाडू), पंकजनाथ करणसिंह (पंजाब),चंद्रशेखरन (हैद्राबाद), विजयकुमार (रामपूर) आदी हजर होते.(तालुका प्रतिनिधी)अण्णांनी दिला तीन महिन्यांचा अवधी४‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ च्या कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटना वाढीसाठी व जनजागरण करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. सगळीकडे संघटन उभारल्यानंतर अण्णा प्रत्येक राज्याचा दौरा करणार आहेत.