‘अमृतवाहिनी’ ठरले राज्यात नववे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:04+5:302021-01-23T04:22:04+5:30

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारांतून तसेच आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था ...

‘Amrutvahini’ became the ninth best engineering college in the state | ‘अमृतवाहिनी’ ठरले राज्यात नववे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय

‘अमृतवाहिनी’ ठरले राज्यात नववे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय

googlenewsNext

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारांतून तसेच आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था गुणवत्ता टिकवून यश संपादन करीत आहे. संस्थेच्या विश्‍वस्त शरयू देशमुख, इंद्रजित थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. इंजिनिअरिंग सक्सेस रिव्ह्यू या विशेष अंकामध्ये या रॅकिंग्स प्रसिद्ध झाल्या आहेत. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सतत उत्कृष्ट निकाल व प्लेसमेंट यामधून कायमच वरिष्ठ स्थान मिळविले आहे. त्यामुळे शिक्षण केंद्र बनलेल्या या महाविद्यालयाकडे विद्यार्थी, पालकांचा कल अधिक आहे. गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मानांकनामध्ये नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशन (एन.बी.ए.) चे तीनदा मानांकन, ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा, ‘आयएसओ’चे सतत मूल्यमापन यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालय ऑनलाईन पद्धतीने पूर्ण क्षमतेने सुरू असून शिक्षणात कुठेही खंड पडलेला नाही.

सर्व्हेअंतर्गत त्यांनी महाविद्यालयाची अध्यापन पद्धती, पायाभूत सुविधा, अध्ययनाची साधने, १०० टक्के प्रवेश, प्रशासन व नेतृत्व, नूतनीकरणाचे प्रयोग व सांस्कृतिक, शिक्षक व विद्यार्थी संशोधन कार्य, रिसर्च पेपर व पब्लिकेशन्स, पीएच.डी.धारक शिक्षक, विदेशी भाषा संभाषण कौशल्य व सॉफ्ट स्किल, प्लेसमेंट, अ‍ॅल्युमिनी नेटवर्क, डिजिटल लायब्ररी, नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी ईडीपी विभाग, उद्योजक व महाविद्यालय समन्वय केंद्र, कन्सल्टन्सी, विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजना आणि महाविद्यालयीन स्तरावर वेगवेगळ्या स्कॉलरशिप, अद्ययावत लॅब, वर्कशॉप, व्यायामशाळा व भव्य क्रीडांगण या वैविध्यपूर्ण उपक्रमांचा विचार करून महाविद्यालयांचे मूल्यमापन केले आहे.

(वा. प्र.)

Web Title: ‘Amrutvahini’ became the ninth best engineering college in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.