अहमदनगर- औरंगाबाद हायवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, जिवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:56 AM2018-05-05T10:56:59+5:302018-05-05T10:56:59+5:30

अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर घोडेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रेलर दुभाजकावर चढल्याने रस्त्यावरच पलटी झाला. या ट्रेलरने आराम बसला धडक दिली. त्याच आराम बसला कार धडकली. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. हा अपघात आज पहाटे झाला.

Ahmednagar- The strange accident of three vehicles on the Aurangabad highway, the jihadhahani avoided | अहमदनगर- औरंगाबाद हायवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, जिवितहानी टळली

अहमदनगर- औरंगाबाद हायवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, जिवितहानी टळली

googlenewsNext

नेवासा : अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावर घोडेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रेलर दुभाजकावर चढल्याने रस्त्यावरच पलटी झाला. या ट्रेलरने आराम बसला धडक दिली. त्याच आराम बसला कार धडकली. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. हा अपघात आज पहाटे झाला.
औरंगाबादकडून नगरकडे लोखंडी अँगल घेऊन ट्रेलर निघाला होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने तो दुभाजकावर चढला. नगरकडून जालन्याकडे जाणा-या आराम बसला ट्रेलर धडकला. आराम बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली. याच आराम बसला नगरवरून औरंगाबादकडे जाणारी कार धडकली. तीन वाहनांच्या या विचित्र अपघातात ट्रेलर पलटी झाला. वाहनांचे नुकसान झाल असले तरी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किरण गायकवाड अपघात स्थळी दाखल झाले. अपघातामुळे दोन्ही बाजूला जवळपास १ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रेलर बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली .

Web Title: Ahmednagar- The strange accident of three vehicles on the Aurangabad highway, the jihadhahani avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.