शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अगस्ती कारखान्याचा प्रदूषण विरहित इथेनॉल प्रकल्प होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 4:19 PM

‘भूमिपूजननंतर अवघ्या ११ महिन्यात साखर कारखान्याची उभारणी’ असा विक्रम नावावर असणा-या अगस्ती साखर कारखान्याच्या प्रति दिन ३० किलो लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अवघ्या १० महिन्यात पूर्णत्वास गेले आहे.

हेमंत आवारी । अकोले : ‘भूमिपूजननंतर अवघ्या ११ महिन्यात साखर कारखान्याची उभारणी’ असा विक्रम नावावर असणा-या अगस्ती साखर कारखान्याच्या प्रति दिन ३० किलो लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अवघ्या १० महिन्यात पूर्णत्वास गेले आहे. पुढील आठवडाभरात प्रकल्पाची चाचणी घेण्याचा मानस अगस्ती प्रशासनाचा असून ‘शून्य टक्के प्रदूषण’ धरतीवर हा प्रकल्प उभा राहिला आहे.८ मार्च २०१९ ला अगस्तीच्या आसवणी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. २०२०च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील आठ दिवसात प्रकल्पाची चाचणी घेतली जाणार आहे. साधारण ९० लाख लिटर क्षमतेपर्यंतच्या लोखंडी टाक्या उभारण्याचे काम अवघ्या नऊ-दहा महिन्यांमध्ये पूर्णत्वास गेले आहे. उसापासून साखर व मोलासेस अन् मोलासेसपासून दर दिवसाला प्रत्येकी ३० हजार लिटर अल्कोहोल, इथेनॉल व ई.एन.अ‍े. तयार होणार आहे.दिवसाला तीन लाख लिटर पाणी बाहेर फेकले जाणार आहे. हे पाणी ९० लाख लिटर क्षमतेच्या भल्या मोठ्या लोखंडी टाकीत साठवले जाणार असून या टाकीतून मिळणाºया ‘गॅस’चा उपयोग बॉयलर इंधनासाठी होणार आहे. तर अस्वच्छ पाण्याचे शुध्दीकरण होत हे पाणी पुन्हा असावाणी प्रकल्पासाठी उपयोगी पडणार आहे. तसेच उरणारे वेस्ट सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोगी येणार आहे. परिसरात दुर्गंधी पसरणार नाही.साधारण पन्नास ते पंच्चावन्न कोटींच्या घरात प्रकल्पाचा खर्च असला तरी प्रकल्प पूर्ण होऊन उत्पादन मिळू  लागल्यावर ऊस उत्पादकांना १५० ते २०० रुपये प्रतिटनाला अधिक भाव मिळेल यात शंका नाही. प्रकल्प उभारणीचे काम करणारी कंपनीच महिनाभर प्रकल्पाची चाचणी घेणार आहे. यंदाच्या गळीत हंगामाच्या ४३ व्या दिवसाअखेर गुरुवारपर्यंत १ लाख ५४ हजार ७८७ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. १ लाख ५८ हजार ८६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदाचा आतापर्यंतचा सरासरी साखर उतारा १०.२४ इतका आहे.

प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आठ-दहा दिवसात प्रकल्पाची चाचणी घेण्याचा मानस आहे. पूर्ण प्रदूषण मुक्त असा हा प्रकल्प साकारत आहे, असे अगस्ती कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी सांगितले.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेSugar factoryसाखर कारखानेEnergy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Vaibhav Pichadवैभव पिचड