शेतीचा वाद...झोपेतच केला घात, जामखेड तालुक्यातील साकतला एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:44 PM2020-05-24T17:44:15+5:302020-05-24T17:44:22+5:30

जामखेड : शेतीच्या वादातून भावकीच्या दोन गटात आठ दिवसांपूर्वी लाठी, काठी, दगडाने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एका युवकाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू  शनिवारी (दि.२३) झाला.  या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Agriculture dispute ... Assault in his sleep, murder of one Saktala in Jamkhed taluka | शेतीचा वाद...झोपेतच केला घात, जामखेड तालुक्यातील साकतला एकाचा खून

शेतीचा वाद...झोपेतच केला घात, जामखेड तालुक्यातील साकतला एकाचा खून

Next

जामखेड : शेतीच्या वादातून भावकीच्या दोन गटात आठ दिवसांपूर्वी लाठी, काठी, दगडाने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एका युवकाच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू  शनिवारी (दि.२३) झाला.  या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जामखेड पोलिसात मयताचा भाऊ अमोल अशोक वराट याने फिर्याद दिली आहे. १६ मे रोजी सकाळी दहा वाजता साकत शिवारात वडील अशोक वराट यांनी आरोपी किरण वराट,  सुदाम वराट, विजय वराट, अजय वराट, उध्दव वराट, विनोद वराट, बाळू उर्फ गणेश वराट यांना आपण सर्वांची शेती मोजणी करून घेऊ म्हणजे वाद मिटेल असे सांगितले होते. याचा राग आल्याने किरण वराट याने शिवीगाळ करून दमदाटी केली व काटा काढण्याची धमकी दिली. 
       वस्तीवर बाहेर झोपलेला भाऊ ओमकार अशोक वराट हा झोपेत असताना अजय व किरण वराट यांनी त्याच्या हातातील दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार घेत असताना भाऊ अमोल याचा शनिवारी मृत्यू झाला. पोलिसांनी मयताचा भाऊ अमोल वराट याच्या फियार्दीवरून सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे. 
 
Web Title: Agriculture dispute ... Assault in his sleep, murder of one Saktala in Jamkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.