शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
4
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
5
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
6
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
9
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
10
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
11
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
12
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
13
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
14
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
15
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
16
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
17
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
18
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
19
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
20
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

‘अस्मिता’साठी ८०० बचतगटांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:55 AM

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींसाठी अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेसाठी जिल्ह्यातील ७८१ बचत गटांनी आॅनलाइन नोंदणी केली.

अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींसाठी अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेसाठी जिल्ह्यातील ७८१ बचत गटांनी आॅनलाइन नोंदणी केली. बचतगटांनी नोंदणी केलेल्या गावांमध्ये अत्यल्प दरात मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहे. नॅपकिनसाठी १३५ बचतगटांनी पुरवठ्याचा आदेश दिला असून, त्यांना नॅपकिन उपलब्ध झाल्या आहेत.अस्मिता योजनेंतर्गत इयत्ता ८ ते १० वीच्या मुलींना अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिन दिली जाणार आहे. ही योजना बचतगटांमार्फत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला बचतगटांची आॅनलाइन नोंदणी सुरू आहे.  जिल्ह्यातील १ हजार ३६४ गावांत महिला बचतगटांमार्फत विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असून, आतापर्यंत ७८१ गावांतील महिला बचतगटांची नोंदणी केली आहे. त्यापैकी १३५ महिला बचतगटांकडून संबंधित कंपनीला आॅनलाइन पुरवठा आदेश दिला आहे. पुरवठा आदेश दिलेल्या जिल्ह्यातील ७९ महिला बचतगटांना संबंधित कंपनीकडून नॅपकिनचा पुरवठा करण्यात आला आहे.शासनाने अस्मिता नावाने अ‍ॅप विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करणे महिला बचतगटांना बंधनकारक आहे. अस्मिता योजनेसाठी नोंदणी करणे, पुरवठा आदेश देणे, शुल्क जमा करणे, ही सर्व प्रक्रिया आॅनलाइन आह़े. ग्रामीण भागात नेटसुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे बचतगटांना नोंदणी व पुरवठा आदेश देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गावात नेटसुविधा नसल्याने बहुतांश गावांत अद्याप विक्री केंद्रासाठी नोंदणीच झाली नाही. परिणामी शासकीय योजनेच्या लाभापासून शाळकरी मुली वंचित असून, महिला बचतगटांनी तातडीने नोंदणी करावी, असेआवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.७९ गावांत विक्री सुरूमहिला बचतगटांनी दिलेल्या पुरवठ्यानुसार जिल्ह्यातील ७९ गावांतील विक्री केंद्रांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ८ ते १० वीतील मुलींना अस्मिता कार्डचे वाटप करण्यात आले आहे. कार्डधारक मुलींना अत्यल्पदरात सॅनिटरी नॅपकिनही उपलब्ध झाली आहे.

महिला बचतगटांची  तालुकानिहाय नोंदणीअकोले.. १५४जामखेड.. ५७कर्जत..... ४०कोपरगाव.. ३८नगर-..... ४८नेवासा..... १०पारनेर..... ९०पाथर्डी..... २०राहाता..... ४९राहुरी...... ६०संगमनेर... ५५शेवगाव... ६१श्रीगोंदा... ४४श्रीरामपूर.. ५५

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद