कोरोना रुग्णांच्या सकस आहारासाठी १ लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:15+5:302021-04-28T04:23:15+5:30

डॉ.क्षितिज घुले पाटील मित्रमंडळाने दिलेल्या मदतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेवगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, तसेच ...

1 lakh assistance for healthy diet of Corona patients | कोरोना रुग्णांच्या सकस आहारासाठी १ लाखाची मदत

कोरोना रुग्णांच्या सकस आहारासाठी १ लाखाची मदत

Next

डॉ.क्षितिज घुले पाटील मित्रमंडळाने दिलेल्या मदतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेवगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, तसेच बऱ्याच रुग्णांना बेड वेळेत उपलब्ध नसल्याने वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे माजी आमदार घुले यांनी पुढाकार घेऊन शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी भावनांमध्ये मारुतरावजी घुले पाटील कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यापासून प्रेरित होऊन कोविड केअर सेंटर येथील रुग्णांना सकस आहार मिळावा, यासाठी क्षितिज घुले पाटील मित्रमंडळातर्फे १ लाख रुपये देणगी देण्यात आल्याचे मित्रमंडळाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी मंडळाचे सदस्य दीपक पठाडे, लक्ष्मण शेळके, रवींद्र तांगडे, गणेश लोखंडे, सतीश टाक, सुभाष वंजारी, राम काळे आदी उपस्थित होते.

Web Title: 1 lakh assistance for healthy diet of Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.