शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पेचात; विभागीय आयुक्तांच्या आदेशाने बदल्यांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 14:52 IST

जिल्हा परिषदेच्या बदल्या सुरु झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने गतवर्षीच्या अपिलांवर आदेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा थेट बदल्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश देऊन आयुक्त कार्यालयाने काही अपिलांचा चेंडू जिल्हा परिषदेकडे टोलावला आहे. 

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या बदल्या सुरु झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने गतवर्षीच्या अपिलांवर आदेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याचा थेट बदल्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश देऊन आयुक्त कार्यालयाने काही अपिलांचा चेंडू जिल्हा परिषदेकडे टोलावला आहे. 

३१ मे ही तारीख गृहीत धरुन जिल्हा परिषद प्रशासन ही कर्मचा-यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करते. त्यानंतर बदल्यांची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कर्मचा-यांकडून हरकती मागवून सेवा ज्येष्ठता यादी तयार केली जाते. नगर जिल्हा परिषदेची ही सर्व प्रक्रिया पार पडून बदल्यांची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त प्रतिभा संगमनेरे यांनी महिला बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिकांच्या गतवर्षीच्या बदल्यांबाबतच्या अपिलांवर जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे. या पर्यवेक्षिकांची विनंती विचारात घेऊन त्यांना विनंतीनुसार प्रथम प्राधान्याने रिक्त पदी पदस्थापना देण्याबाबत कार्यवाही करावी, असे या आदेशात म्हटले आहे. 

अपिलावरील आदेश हा बदल्यांची प्रक्रिया सुरु येण्यापूर्वी अपेक्षित असतो. एखाद्या कर्मचा-यावर अन्याय झाला असेल तर आयुक्त कार्यालयाने तसे स्पष्ट नमूद करुन आदेश देणे अभिप्रेत आहे. मात्र, बदल्यांची यादी तयार झाल्यानंतर आयुक्त कार्यालयाने संदिग्ध आदेश काढला आहे. 

कर्मचाºयांची विनंती प्राधान्याने विचारात घ्यावी असे सांगताना २०१४ च्या बदली आदेशानुसार कार्यवाही करावी, असेही म्हटले आहे. त्यामुळे नेमके करायचे काय? हा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर आहे. बदली जर नियमात बसत नसेल तर ती करायची कशी? हा संभ्रम आहे. आयुक्त कार्यालयाच्या आदेशावर जिल्हा परिषदेकडे लेखी हरकत नोंदविण्यात आली आहे. 

नियमाशी विसंगत आदेशमहिला बालकल्याण विभागातील एका पर्यवेक्षिकेबाबत विभागीय आयुक्तांनी यापूर्वी काढलेल्या आदेशाला हरकत घेतली जाताच आयुक्त कार्यालयाने तो आदेश तातडीने स्थगित केला होता. आता पुन्हा याच पर्यवेक्षिकेची विनंती विचारात घेण्याबाबत आदेश काढण्यात आला आहे. आयुक्त कार्यालय या बदलीबाबत वारंवार आदेश देताना दिसत आहे. 

कर्मचा-यांनी बदल्यांमध्ये आमच्यावर अन्याय झाला असे अपिल केले होते. त्यामुळे त्यांची विनंती विचारात घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी, असे आम्ही पत्रात म्हटले आहे. आम्ही अंतिम निर्णय दिलेला नसून याबाबतची कार्यवाही ही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी करावी, असे म्हटले आहे.     - प्रतिभा संगमनेरे, उपआयुक्त (आस्थापना)

या आदेशाबाबत शासनाच्या बदली धोरणानुसार मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.- संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र