शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पालकमंत्र्यांच्या उपकारावर जिल्हा परिषद मिळवली नाही : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 14:22 IST

विखे परिवार अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.

हळगांव : विखे परिवार अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. मात्र आम्ही श्रेय लाटण्यासाठी कधीच खोटेपणा केला नाही. पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून बोगसपणाचे राजकारण सुरू आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसने मिळवलेली सत्ता ही कुणी दान केलेली नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाने कष्ट घेतले. जिल्हा परिषदेची सत्ता पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपकारावर मिळवलेली नाही, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले.जामखेड तालुक्यातील हळगांव येथील श्री सिध्देश्वर दत्त देवस्थानच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी विखे बोलत होते.सुजय विखे म्हणाले, कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघात २५ वर्षापासून भाजपा सत्तेत आहे. तरीही मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. मतदारसंघात पालकमंत्र्यांकडून कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या गप्पा मारल्या जातात मग हा निधी गेला कुठे? नुसते भूमीपूजन होत असतील अन विकास कामे होत नसेल तर मग पालकमंत्र्यांच्या फसवेगिरी विरोधात मी बोलणारच. आमची स्पर्धा पालकमंत्र्यांशी नाही तर माझे भांडण पालकमंत्री पदाशी आहे. ज्या दिवशी छावण्या पालकमंत्री सुरू करतील त्या दिवशी माझे भाजपाविरोधी भाषण बंद होईल, असे सांगत जोवर छावण्या सुरू होत नाहीत तोवर मी शेतक-यांचा आवाज बनून भाजपाविरोधात आपली भूमिका मांडत राहणार. दुष्काळात जनतेला दिलासा देण्यात पालकमंत्री अपयशी ठरत आहेत. ज्या पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला जातो ते काय जिल्ह्यातील दुष्काळावर जनतेला दिलासा देतील असा सवाल विखे यांनी केली. भाजपाने तीव्र, मध्यम, कमी असा नवीन दुष्काळ तयार करत जनतेची थट्टा चालवली आहे. एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिंदेंनी तीव्र, मध्यम व कमी दुष्काळाची नेमकी व्याख्या काय आहे हे जनतेला सांगावे.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटो अथवा न सुटो दक्षिणेचा गड कुठल्याही परिस्थितीत काबीज करायचाच आहे त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढवेन पण भाजपसोबत जाणार नाही अशी घोषणा करत लोकसभेचे मैदान मारण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे सांगत आपली पुढील दिशा स्पष्ट केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते किसनराव ढवळे हे होते. यावेळी सिध्देश्वर दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे, सरपंच अनिता सुशेन ढवळे, राजेंद्र ढवळे, किसनराव ढवळे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय ढवळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात, युवकचे अध्यक्ष अमोल राळेभात, लतिफभाई शेख, बबनराव तुपेरे, आप्पासाहेब उबाळे, धनगर समाजाचे जेष्ठ नेते मारूती करगळ, अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे अध्यक्ष आबासाहेब ढवळे, डॉ अविनाश पवार, राजुभैय्या सय्यद, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, धनेगांवचे सरपंच कल्याण काळे, कृष्णा चव्हाण, कांतीलाल ढवळे, भिमराव डूचे, नानासाहेब ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय ढवळे यांनी केले तर सुत्रसंचालन हनुमंत निकम यांनी केले.छावण्या कधी सुरु करणाररस्ते नको, मंदिर नको आता दुष्काळात जनतेला पिण्याचे पाणी व पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या कधी सुरू करणार याची तारिख पालकमंत्री राम शिंदेंनी जाहिर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांच्या नियोजनाच्या कौशल्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता नियोजनाचे कौशल्य शिंंदे यांनी दाखवावं. नियोजनाचे कौशल्य दाखवले तर विधानसभेला त्यांचा प्रचार करेन, असे सुजय विखे म्हणाले.

दक्षिण लोकसभा मतदार संघ आजारीकोण कुठून आला याला महत्व नाही. जनतेच्या प्रश्नासंबंधी जो थेटपणे आक्रमक भूमिका घेईल. त्याचबरोबर स्व कर्तृत्वावर जनतेला दिलासा देईल याला महत्व आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघ आजारी पडला आहे. स्थानिक डॉक्टरांनी( सत्ताधारी भाजपाने) जनतेला फसवल्यामुळे जनतेने बाहेरील मेंदूचा डॉक्टर बोलवला आहे. आता ऐकेकाचे मेंदू ठिक करण्याचे काम करावे लागणार असल्याचे विखे म्हणाले.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड