श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी युवराज बाबाजी चितळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपाध्यक्ष केशवराव मगर यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी २३ डिसेंबर रोजी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर गंभीर आरोप करीत पदाचा राजीनामा दिला होता. ७ एप्रिल रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत केशवराव मगर यांचा उपाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याने उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. सोमवारी (दि. ७) दुपारी प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक पार पडली.
उपाध्यक्षपदासाठी युवराज चितळकर यांच्या नावाची सूचना योगेश भोईटे यांनी मांडली. त्यास विश्वनाथ गिरमकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी युवराज चितळकर यांची निवड बिनविरोध झाली.
दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी अपवाद वगळता सर्वच संचालकांनी फिल्डिंग लावली होती. परंतु, कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी युवराज चितळकर यांच्या रूपाने पहिल्यांदाच धनगर समाजाला नागवडे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे.
---
०७ नागवडे कारखाना निवड
नागवडे कारखानाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर युवराज चितळकर यांचा राजेंद्र नागवडे यांनी सन्मान केला.