शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारकला वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; नोकरीऐवजी घडवतोय मातीची मडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:07 IST

पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे.

खासेराव साबळे ।  पिंपळगाव माळवी : पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे.हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण, समारंभावेळी मातीपासून बनविलेल्या विविध वस्तूंना मोठे महत्त्व आहे. त्या वस्तू पारंपरिक पद्धतीने बनविण्यात कुंभार समाजाचे मोठे योगदान आहे. सध्या या समाजातील तरुण पिढी या व्यवसायापासून दुरावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ही कला लोप पावत चालली आहे. परंतु, पिंपळगाव माळवी येथील कुंभार समाजातील पदवीधर तरुण राजू काशिनाथ काळे याने नोकरी न करता ही पारंपरिक कला जोपासण्याचा चंग बांधला आहे. राजूला त्याचे वडील काशीनाथ दगडू काळे (वय ८५) यांनी  स्वत: या कलेत पारंगत केले आहे व विविध वस्तू बनविण्याचे धडे दिले आहेत.सध्या राजू मकरसंक्रांत सणासाठी लागणारे सुगडे तयार करण्यात व्यस्त आहे. हा तरूण दीपावली, मकरसंक्रांत, अक्षयतृतीया , उन्हाळ्यातील पाण्याचे माठ, झाडांच्या कुंड्या, पणत्या, गणेश मूर्ती तयार करणारा पिंपळगाव पंचक्रोशीतील एकमेव कारागीर आहे. या मातीच्या वस्तू भाजण्यासाठी ‘आवा लावणे’ ही कलाही तो शिकला आहे. कुंड्या तयार करण्यात त्याने विशेष कौशल्य हस्तगत केले आहे.या व्यवसायास लागणारी माती, जळन, घोड्याची लिद उपलब्ध होत नाही. परंतु, त्यासाठी बरीच भटकंती करून या वस्तू जमा करव्या लागतात, असे त्यांनी सांगितले. या व्यवसायामध्ये त्याला पत्नीची मदत मिळते. यातूनच तो या व्यवसायातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह व दोन मुलांचे शिक्षण करत आहे. ग्रामीण भागामध्ये हा पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक या व्यवसायामध्ये पूर्णवेळ उतरलो. या व्यवसायातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे राजू काळे याने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिकcultureसांस्कृतिक