शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चांदीच्या कमळातील साईमूर्तीचे पूजन; तिजोरीतील सोन्याची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:42 IST

मुख्य लक्ष्मीपूजनापूर्वी संस्थानच्या स्ट्राँग रूममधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पूजन करण्यात आले़

शिर्डी : आयुष्यभर फकिराचे आयुष्य जगलेल्या सार्इंच्या संस्थानात भाविकांच्या दानातून आलेल्या सोन्या-चांदीच्या राशी व लाखो रूपयांच्या रूपाने वसणाऱ्या लक्ष्मीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले़ फाटके-तुटके वस्त्र परिधान करणाºया बाबांच्या समाधी व मूर्तीवर लक्ष्मीपूजनानिमित्त कोट्यवधी रूपयांचे सुवर्णालंकार घालण्यात आले होते़ बाबा नेहमी म्हणत, भक्त ठेवतील तसा मी राहील, यानिमित्ताने त्याची प्रचिती आली़

साईसमाधीसमोर सुशोभित केलेल्या चांदीच्या चौरंगावर कमळात असलेल्या लक्ष्मी मूर्तीची व साई मूर्तीची संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व जयश्री मुगळीकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ हजारो भाविकांनी पाकिटात घालून पूजेसाठी दिलेल्या लाखो रूपयांचेही यावेळी पूजन करण्यात आले़

मुख्य लक्ष्मीपूजनापूर्वी संस्थानच्या स्ट्राँग रूममधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पूजन करण्यात आले़ तिजोरीतील साडेचारशे किलो सोने व साडेपाच हजार किलो चांदीसह संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकेत २ हजार २५० कोटींच्या ठेवी आहे़ या निधीचा उपयोग, भाविकांसाठी निवास, प्रसाद भोजन तसेच रूग्णालये, शिक्षण संकुल आदींसाठी संस्थान करत असते़साईबाबांचे रोजचे दानभीक्षा मागून खाणारे साईबाबा आपल्या हयातीत रोज ठराविक लोकांना व दीन-दुबळ्यांना किमान दोनशे ते अडीचशे रूपये वाटत. जास्त उत्पन्न मिळते या भावनेतून ब्रिटिश सरकारने बाबांना इन्कमटॅक्स लावण्याचे ठरवले होते. त्यासाठी एक अधिकारी नियुक्त केला़ मात्र बाबांना दानातून मिळणाºया रकमेपेक्षा ते अधिक वाटतात, असे लक्षात आले़ आलेल्या व वाटलेल्या रकमेचा ताळमेळ बसेना. त्यामुळे ब्रिटिश सरकारने अखेर हा नाद सोडून दिला.

टॅग्स :saibabaसाईबाबा