नेवासा : नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील ३३ केव्ही क्षमतेच्या सबस्टेशनच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढील २ महिन्यांत पूर्ण करून लवकर कामाची सुरुवात झाल्यानंतर काम एक वर्षात पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील विजेच्या अडचणींसंदर्भातील बैठक ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात गुरुवारी पार पडली. यावेळी तनपुरे यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत, अधीक्षक अभियंता प्रवीण परदेशी, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, भाऊसाहेब बडे, शरद चेचर, अरविंद कुकडे उपस्थित होते.
तालुक्यातील सोनईजवळील धनगरवाडी येथील ३३ केव्ही क्षमतेचे सबस्टेशन मंजूर असून या कामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध झाल्यानंतर या सबस्टेशनचे कामही लवकरात लवकर हाती घेतले जाईल. त्याचबरोबर तालुक्यातील तामसवाडी, खुपटी, रांजणगाव देवी, प्रवरासंगम या ठिकाणीही सबस्टेशन प्रस्तावित आहे. या सबस्टेशनला शासनस्तरावर निधीची उपलब्धता झाल्यानंतर हे काम हाती घेतले जाईल. मात्र, दरम्यानच्या काळात या सर्व ठिकाणच्या सब स्टेशनचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर माका, घोडेगाव, चांदा, बेलपिंपळगाव येथे सध्या अस्तित्वात असलेले उपककेंद्र सातत्याने ओव्हरलोडने चालत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे गडाख यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यानंतर या उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्याच्या सूचना बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
प्रवरासंगम येथे सबस्टेशनसाठी तत्काळ सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सिंगलफेज योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या सर्व ठिकाणांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. ज्या सबस्टेशनमध्ये एसडीटी ट्रान्सफार्मर नसतील तेथे ते बसविण्यात येणार आहेत.
---
०९ गडाख
मुंबईत मंत्रालयातील बैठकीत मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व इतर.
090921\img-20210909-wa0072.jpg
फोटोओळी
मुंबई मंत्रालयात नेवासा तालुक्यातील वीजप्रश्नांबाबद ना शंकरराव गडाख व ना प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली.