शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत साजरे होतेय महिला सन्मान वर्ष; लोहार-सुतार समाजाची मुलगी शाळेत जाण्याच्या घटनेची शतकपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:25 IST

शिर्डीत लोहार समाजातील पहिली मुलगी शाळेत जाण्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील गाडी लोहार-सुतार समाजाच्या वतीने हे वर्ष समाजातील महिलांसाठी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल.

ठळक मुद्देशिर्डीत लोहार समाजातील पहिली मुलगी शाळेत जाण्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे होत आहेत.त्या पार्श्वभूमीवर येथील गाडी लोहार-सुतार समाजाच्या वतीने हे वर्ष समाजातील महिलांसाठी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल.समाजाच्या वतीने सोमवारी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.यंदा सर्व महिलांनी रेशमी फेटे परिधान केले होते. विश्वकर्मा प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. 

शिर्डी : शिर्डीत लोहार समाजातील पहिली मुलगी शाळेत जाण्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील गाडी लोहार-सुतार समाजाच्या वतीने हे वर्ष समाजातील महिलांसाठी सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्त समाजातील मुलींचे शिक्षण, आरोग्य व सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गाडी लोहार-सुतार संघटनेचे अध्यक्ष हिरामण वारूळे यांनी सोमवारी जाहीर केले.समाजाच्या वतीने सोमवारी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, मंगेश त्रिभुवन, सुजित गोंदकर, नितीन कोते, दत्तात्रय कोते, रवींद्र गोंदकर, छाया पोपट शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शहरात स्वच्छता अभियान सुरू असून शहर राज्यातील पहिल्या तीस शहरात आले आहे. नागरिकांनी थोडा आणखी प्रयत्न केल्यास सार्इंची शिर्डी स्वच्छतेत राज्यात पहिली येऊ शकेल. त्यादृष्टीने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नितीन कोते व सुजित गोंदकर यांनी यावेळी केले.गेल्या एकवीस वर्षांपासून शिर्डीत विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येते. यंदा सर्व महिलांनी रेशमी फेटे परिधान केले होते. त्यापूर्वी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यात सुनील वारुळे, चंद्रकांत वारूळे, पंकज सुरेश हारळे, मच्छिंद्र वारूळे, भूषण भालेराव, नरसिंग पवार, सोमनाथ वारूळे, विपीन सुभाष वारूळे, विकी सुरेश वारूळे, गणेश राधाकिसन वारूळे आदींसह मोठ्या प्रमाणावर समाजबांधव व नागरिक सहभागी झाले होते.

बबईबाई वारूळे लोहार समाजातील पहिल्या विद्यार्थिनी

साईबाबा समाधीस्त होण्यापूर्वी मंगळवार, ३ सप्टेंबर १९१८ रोजी बबईबाई नथु वारूळे यांच्या रूपाने लोहार समाजातील पहिली महिला शाळेत गेली. या ऐतिहासिक घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष संस्मरणीय करण्यासाठी समाजातील तरुणांचा विशेष प्रयत्न आहे. त्यादृष्टीने समाजातर्फे हे महिला सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. समाजातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, तिचे पैशाअभावी शिक्षण अडणार नाही याकडेही लक्ष देण्यात येणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी