शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निंबळक ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडामोर्चा

By admin | Updated: April 18, 2017 17:25 IST

नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला.

निंबळक : नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने मंगळवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला. ग्रामपंचायत सदस्य मोनिका कोतकर, सुवर्णा कोतकर, सुमन मदने, सुभाष कोरडे, बी.डी. कोतकर, मुरलीधर कोतकर, साहेबराव मदने,अविनाश कोतकर,दत्तात्रय कोतकर,हरीश कळसे,संजय गायकवाड यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. मिसळ व उपसरपंच घनश्याम म्हस्के यांच्याकडे निवेदन देण्यात आले.नगर शहरापासून जवळच असलेल्या निंबळक गावात पाण्याचे तीव्र संकट ओढवले आहे. दहा ते बारा दिवसांतून एकदाच पाणी सुटत असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरु करावा, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र तरीही पाणी वेळेवर सुटत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी गावातून फेरी काढली. पाणी वेळेवर का सुटत नाही, आम्ही पाणीपट्टी वेळेवर भरूनही अशी परिस्थिती का उद्भवते, अशा प्रश्नांचा महिलांनी ग्रामसेवक, उपसरपंच यांच्यावर भडीमार केला. पाण्याचे वितरणव्यवस्था समांतर नसल्यामुळे पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लवकरच सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन ग्रामसेवक एस.व्ही.मिसाळ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत ३२ हातपंप असून, त्यामधील फक्त चारच हातपंपाला पाणी आहे. हातपंप ग्रामपंचायतीने दुरुस्त केले. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने पाणी येत नसल्याचे उपसरपंच घनश्याम म्हस्के यांनी सांगितले.उन्हाळ््यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. यामुळे महिलांची धावपळ होते. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्यात येईल.-मोनिका कोतकर, ग्रामपंचायत सदस्य-लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून गावाला होणारा पाणीपुरवठा कमी आहे. चार दिवसांतून एक तास पाणी सोडले जाईल. गावात जवळपास १५७१ नळजोडणी व ३३ वॉल आहेत. एका नळजोडणीला ७० ते ८० कनेक्शन असल्याने सर्वाना पाणी जात नाही. एका नळजोडणीला ३० ते ४० कनेक्शन जोडण्यात येतील. जेणेकरून सर्वाना पाणी मिळेल. - एस.व्ही.मिसाळ, ग्रामसेवक