शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अनधिकृत शाळांवर गुन्हे नोंदविणार

By admin | Updated: June 27, 2014 00:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा व संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा व शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला़

अहमदनगर : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा व संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा व शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला़जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि़२६) झाली़ बाळासाहेब हराळ यांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित केला़ शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता सुरु झालेल्या काही अनधिकृत शाळांची नावेच हराळ यांनी सभेत जाहीर केली़ या शाळांबाबत शिक्षण विभागही अनभिज्ञ होता़ हराळ यांच्या मुद्याची दखल घेत अनधिकृत शाळा व संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले़ वाळकी गटात शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वाटप करुन आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम गेल्या सहा महिन्यापासून राबविण्यात येत असल्याचे बाळासाहेब हराळ यांनी सांगून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आरोग्य कार्डाचे वाटप करावे, अशी मागणी केली़ हराळ यांची ही मागणी मान्य करीत प्राथमिक आरोग्य केंद्रातून शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वितरीत करण्याचा व त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला़ अकोले, नेवासा, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी येथे नगरपंचायत व नगरपरिषदांची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ त्यासाठी जिल्हापरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठरावही या सभेत घेण्यात आला़ शॉपिंग सेंटर बांधण्यासाठी कुकाणा (ता़ नेवासा) ग्रामपंचायतीला ३० लाख व म्हातारपिंप्री (ता़ श्रीगोंदा) ग्रामपंचायतीला २२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली़ तर वडगाव लांडगा (ता़ संगमनेर) ग्रामपंचायतीच्या कार्यालयासाठी ११ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याण समितीचे सभापती शाहूराव घुटे, बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांच्यासह सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते़(प्रतिनिधी)लाखो रुपयांच्या योजनांना मान्यतापहिली ते बारावीच्या सुमारे १२०० विद्यार्थिनींनी लेडीज सायकल पुरविण्यासाठी ३९ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़विशेष घटक योजनेअंतर्गत सुमारे ६५६ मागासवर्गीय महिलांना मोफत पिको फॉल पुरविण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला़महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील ७३८ महिलांना मोफत पिको फॉल पुरविण्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़सातवी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्यासाठी ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आले़ग्रामीण व आदिवासी ६६६६ मुलींना स्वसंरक्षणार्थ व शारिरीक विकास प्रशिक्षणासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले़आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना आहार पुरविण्यासाठी ६ लाख व विशेष आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ३७ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़हातपंप दुरुस्तीसाठी ३० कंत्राटी कर्मचारी व ३९ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़मीटरने पाणीशेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरील बिलाची वसुली होत नसल्यामुळे वीज बिल भरणे शक्य होत नाही़ त्यामुळे या योजनेवरील गावांना आता मिटरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़ त्यासाठी ३३ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने मंजूर केला आहे़ त्यामुळे आता बुऱ्हाणनगर पाणी योजनेप्रमाणेच शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेवरही मीटर बसणार आहे़