शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

वन्यजीवांची वणवण थांबणार !

By admin | Updated: October 20, 2016 01:28 IST

योगेश गुंड , अहमदनगर गेल्या चार ते पाच वर्षांपासून पावसाअभावी होणारी वन्यप्राण्यांची होरपळ यंदा होणार नाही. परतीच्या पावसाने बऱ्यापैकी कृपा केल्याने वन्यजीवांसाठी चारा

योगेश गुंड , अहमदनगर गेल्या चार ते पाच वर्षांपासून पावसाअभावी होणारी वन्यप्राण्यांची होरपळ यंदा होणार नाही. परतीच्या पावसाने बऱ्यापैकी कृपा केल्याने वन्यजीवांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न यावर्षांपुरता सुटला आहे. यामुळे नगर तालुक्यातील वन्यप्राण्यांना करावी लागणारी भटकंती यंदा करावी लागणार नाही. मुबलक चारा, पाण्यामुळे वन्यजीव सुखावला आहे.नगर तालुक्यात सुमारे ८ हजार ४०० हेक्टर इतके वनक्षेत्र आहे. या क्षेत्रावर हरीण, काळवीट, तरस, लांडगे, कोल्हे, ससा, मोर, खोकड तसेच अन्य वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे.गेल्या चार ते पाच वर्षांपासून नगर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलाव तसेच अन्य पाणी साठे सतत कोरडे पडत असल्याने व चाऱ्याची कमतरता असल्याने या वन्यजीवांना पाणी, चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत होती. उन्हाळ्यात जिथे माणसांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तिथे या मुक्या जीवांना तर वणवण करण्याची वेळ आली होती. काही निसर्गप्रेमींनी वन्यप्राण्यांचे अस्तित्व असणाऱ्या माळरानात पाणवठे तयार करून त्यांना दुष्काळात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र परतीच्या पावसाने चांगली कृपा केली. नगर तालुक्यात बहुताश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने तलाव, बंधारे, समतलचर, पाणवठे यांच्यात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. तसेच पावसामुळे हिरवा चारा मुबलक उपलब्ध झाल्याने या वन्यप्राण्यांना पाणी आणि चारा यासाठी करावी लागणारी भटकंती यावेळी करावी लागणार नाही. नगर तालुक्यात गुंडेगाव, देऊळगावसिद्धी, अकोळनेर, चास, कामरगाव, भोयरेपठार, घोसपुरी, सारोळाकासार, जेऊर, चिचोंडीपाटील, रांजणी, माथनी, डोंगरगण, हिवरे बाजार आदी परिसरात वन्य प्राण्यांचे मोठे अस्तित्व आहे. नगर तालुका व परिसरात सुमारे १५० पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात आहेत. मात्र पाण्याअभावी त्यांची संख्या व अस्तित्व कमी होत गेले. यावेळी चांगला पाऊस झाला. कापूरवाडी, पिंपळगाव माळवी या मोठ्या तलावात भरपूर पाणीसाठा झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून ते कोरडे असल्याने स्थलांतरीत व विदेशी पक्ष्यांचे आगमन येथे होऊ शकले नाही. यावेळी पाणीसाठा वाढला आहे. यामुळे काही वर्षापासून दिसेनासा झालेला ‘फ्लेमिंगो’ हा आकर्षक पाहुणा पक्षी यंदा नगरच्या तलावावर विहरण्यासाठी येण्याची शक्यता आहे. पक्षी निरीक्षणाचा आनंद नगरकरांना घेता येईल, असे पक्षी अभ्यासक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.