शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची फिर्याद.. पतीने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीसह नऊ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:24 IST

नव-याने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद त्याच्या बायकोने नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नेवासा : नव-याने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद त्याच्या बायकोने नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संगीता महादू खेमनर (वय ३०, रा. साकूर, ता. संगमनेर, हल्ली रा. अंमळनेर, ता. नेवासा) हिने याबाबत फिर्याद दिली आहे. संगीता ही अंमळनेर (ता. नेवासा) येथे आई, वडील,भाऊ, भावजयी यांच्यासह राहते. तिचा विवाह महादू खंडू खेमनर (रा. साकूर, जांभळवाडी, ता. संगमनेर) याच्याशी २४ मार्च २००८ रोजी अंमळनेर येथे झाला.

 लग्नानंतर दोन वर्ष पतीसह सासरच्यांनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणातून त्रास देण्यास सुरूवात केली. पतीही वारंवार छोट्या कारणावरूनही मारहाण करायचा. अनेकदा उपाशीपोटीही ठेवायचे. याबाबतची माहिती वडील रामदास सोन्याबापू बाचकर यांना दिली. त्यांनी संगीता हिला माहेरी नेले. तेव्हापासून ती वडिलांकडे माहेरी राहत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

२६ मे २०२० रोजी संगीताचा पती महादू खेमनर याने खुपटी येथे महादेव मंदिरात दुपारी २ वाजता एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले. सासरा खंडू बायजी खेमनर, सासू गंगुबाई खंडू खेमनर, रख्मा खंडू खेमनर, जालिंदर खंडू खेमनर (सर्व रा. साकूर, जांभूळवाडी, ता. संगमनेर), धोंडीबा लक्ष्मण पुणेकर  व अल्पवयीन मुलीचे आई, वडील, मामा यांनी लग्न लावले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

 पती महादू खंडू खेमनर याच्यासह नऊ जणांविरोधात बाल विवाह प्रतिबंधित कलमानुसार गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाCrime Newsगुन्हेगारी