शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींचे नाव घेणाऱ्या मिशेलमामाचा बोलविता धनी कोण?- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 21:14 IST

 सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. 

अहमदनगर : देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी नगर येथे केली.अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांना संपविण्यासाठी सत्तेचा गैरवापर ही भूमिका यापूर्वी कधीही स्वीकारली गेलेली नाही. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना अडचणीत आणण्याची भाषा करीत आहेत. संरक्षण विभागातील गैरव्यवहाराचे पुरावे देणाऱ्यांना धरून आणले जाईल. परदेशात जो एजंट आहे, त्याला आणत आहोत. त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. आम्ही ती लवकरच जाहीर करणार असून, विरोधकांना आम्ही धडा शिकवणार आहोत, असे पंतप्रधान भाषणातून सांगत आहेत. मी ते करून दाखविणारच माझे नाव मोदी आहे, असे ते सांगत आहेत. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर गैरव्यवहारात परदेशातील मिशेल मामा आता भारतात आला आहे. त्याची चौकशी होईल. गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान जे सांगत होते, मिशेलमामा आता काय बोलणार ते बघाच. या प्रकरणात काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे नाव मिशेलने घेतल्याचे ईडीने सांगितले आहे. म्हणजेच सत्तेचा एवढा मोठा गैरवापर केला जात आहे. त्याचा अतिरेक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हे देशावरील मोठे संकट असून, यासंदर्भात संसदेच्या येणा-या अधिवेशनात सर्व विरोधकांना एकत्र करून आवाज उठविणार असल्याचे पवार म्हणाले़ सरकारने आरबीआय, न्यायव्यवस्था आणि सीबीआय या सर्व संस्थांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे देशाची आणिबाणी धोक्यात आली असल्याचे ते म्हणाले.शेतकरी कर्जमाफीची पंतप्रधानांकडून थट्टातीन राज्यांतील सरकारांनी शेतक-यांना कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या राज्यांना अर्थिक मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेणे अपेक्षित आहे. मात्र देशांच्या पंतप्रधानांनी या कर्जमाफीची लॉलीपॉप, असे म्हणून एक प्रकारे थट्टा केली आहे. शेतक-यांची स्थिती अत्यंत बिकट झालेली असताना देशाच्या पंतप्रधानांनी कर्जमाफीबाबत, असे विधान करणे योग्य नाही़, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार