शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? टॅँकरमध्ये भरले ‘कुकडी’चे दूषित पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:09 IST

ठरवून दिलेल्या उद्भवावर पाणी न भरता कुकडी कालव्यातील दूषित पाणी टॅँकरमध्ये भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी (दि.१०) बेलवंडी येथे उघड झाला.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : ठरवून दिलेल्या उद्भवावर पाणी न भरता कुकडी कालव्यातील दूषित पाणी टॅँकरमध्ये भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी (दि.१०) बेलवंडी येथे उघड झाला. त्या टॅँकर चालकाकडे लॉगबुकही नव्हते. टॅँकरवर कोणत्याही प्रकारचा फलक नव्हता. दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या टॅँकरवाल्यांवर काय कारवाई होणार? हा आता प्रश्न आहे.नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी घोड, विसापूर, मोहरवाडी, भावडी तलाव, पेडगाव व थिटे सांगवी ही पाणी भरण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. सध्या कुकडी कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळेच या टॅँकर चालकांनी नवी शक्कल लढविल्याचे दिसते. त्यांनी कुकडी कालव्यावरच डिझेल इंजिन टाकून टॅँकर भरण्याचा सपाटा सुरू केला आहे. लोणी व्यंकनाथ, बेलवंडी येथे टॅँकरचे ‘स्टिंग’ केले. प्रथम लोणी व्यंकनाथ येथे कुकडी कालव्यावर पाणी भरताना एक टॅँकर आढळला. टॅँकर चालकाकडे लॉगबुकची मागणी केली. लॉगबुक ग्रामसेवकांच्या पिशवीत असल्याचे त्याने सांगितले. परवाना फलकही त्याने लावलेला नव्हता. तुम्हाला कोठे पाणी भरण्याची परवानगी आहे, असे विचारले असता त्याची बोलती बंद झाली. हा ठेका कोणी घेतला, असे विचारले असता राळेगणसिद्धीतील पठारे यांनी घेतल्याचे त्याने सांगितले. लोणीव्यंकनाथचे ग्रामसेवक खामकर यांच्याकडे लॉगबुकची मागणी केली. ते म्हणाले, लॉगबुक कुठे आहे ते पाहावे लागेल. पण माझ्याकडे नाही.बेलवंडी गावातही एक टॅँकर कुकडी कालव्यावरच भरताना चालक आढळला. त्याला लॉगबुक विचारले असता माने भाऊसाहेबांकडे आहे, असे सांगितले. त्या टॅँकरवरही फलक नव्हता. कुकडी कालव्यातून शासकीय टँकर भरण्यास परवानगी कोणी दिली? यावर कुकडीचे अधिकारी व बीडीओ काय कारवाई करणार? ‘लोकमत’ने व्हिडिओ बीडीओंना सादर केला आहे.टँकर जर उद्भवाच्या ठिकाणी भरले गेले नाहीत असे आढळले तर ग्रामसेवक व ठेकेदार यांच्यावर कारवाई केली जाईल. एजन्सीने एप्रिल महिन्याचे बिल अद्याप जमा केलेले नाही. जीपीएस सिस्टीम तपासण्याचे काम ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा करत आहे. त्यांचा शेरा घेऊनच आम्ही बिल अदा करतो. -प्रशांत काळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद