शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुणी, शाळा देतं का रे? शाळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:40 IST

आॅनलाईन प्रक्रियेव्दारे बदली झालेल्या शिक्षकास शाळेवर हजर करून घेण्यास मुख्याध्यापकांनीच नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा सावळा गोंधळशिक्षण अधिकाऱ्यांचेही मौन

अहमदनगर: आॅनलाईन प्रक्रियेव्दारे बदली झालेल्या शिक्षकास शाळेवर हजर करून घेण्यास मुख्याध्यापकांनीच नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर कळस असा की, जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिका-यांनी संबंधित शिक्षकाला नियुक्तींच्या ठिकाणी हजर होण्याचा तोंडी आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या शिक्षकाला कुणी शाळा देतं काय? शाळा ? असे म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्हा परिषद शिक्षकांच्या राज्यस्तरावरून आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला (दि़ २८ मे) रोजी शिक्षकांच्या बदलीचे आॅनलाईन आदेश प्राप्त झाले़ शिक्षण विभागाने दुस-या दिवशी २९ मे रोजी शिक्षकांना बदलीचे आदेश दिले व तात्काळ शाळेवर हजर होण्याचा आदेश दिला. श्रीगोंदा तालुक्यातील यवती जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेले नाथा बापूराव काळे यांची बदली याच तालुक्यातील चांभुर्डी शाळेत झाली़. तसा आदेश गटशिक्षण अधिका-यांनी दिला. हा आदेश घेऊन ते चांभुर्डी शाळेत गेले़ मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांनी हजर होत असल्याचा अहवाल देण्याची विनंती केली. मात्र त्यांनी आमच्या शाळेतील भाषा विषयाच्या शिक्षकांची बदलेली झालेली नाही. त्यामुळे त्यांना हजर करून घेता येणार नाही, असे सांगितले. त्यावर काळे यांनी लेखी देण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी तसे लेखी देण्यास टाळाटाळ करत यासंदर्भात गट शिक्षण अधिका-यांचे मार्गदर्शन मागविले. तसेच मुख्याध्यपकांनी काळे यांना गट शिक्षण अधिका-यांची भेट घेण्यास तोंडी सांगितले. काळे यांनी तालुक्याला येऊन गटशिक्षण अधिका-यांची भेट घेतली़ त्यांनी शिक्षणाधिका-यांची भेट घेण्यास सांगितले. त्यामुळे काळे यांनी मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला़ जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची काळे यांनी भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. शिक्षणाधिका-यांकडून न्याय मिळेल, अशी काळे यांना आशा होती. मात्र शिक्षणाधिका-यांनीही शाळेत हजर होण्याचा तोंडी आदेश दिला़. त्यामुळे पुन्हा ते शाळेत गेले.  पण त्यांना हजर करून घेण्यात आले नाही. शिक्षणाधिकारी व गटशिक्षण अधिका-यांच्या घोळातच काळे यांची हजर होण्याची मुदत संपून गेली आहे.शासनाच्या आदेशाचा अवमानबदली झालेल्या शाळेवर काळे यांना हजर करून घेण्यात आले नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीत ते हजर होऊ शकले नाहीत. संबंधित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षण अधिका-यांनी शासनाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काळे यांनी शासनाकडे केली आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद