शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पाच वर्षात लोखंडे यांनी काय विकास केला? : भाऊसाहेब कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:13 IST

खासदार म्हणून काम करताना केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळवत मतदार संघाचा विकास साधता येतो.

संगमनेर : खासदार म्हणून काम करताना केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळवत मतदार संघाचा विकास साधता येतो. मात्र, १७ दिवसात खासदार झालेले सदाशिव लोखंडे हे पाच वर्ष मतदारसंघातून गायब होते. त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुठलाही विकास केला नाही, अशी टीका आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केली.मंगळवारी संगमनेर तालुक्यातील वाघापूर, समनापूर, खराडी, देवगाव, जाखुरी, निमगाव टेंभी, शिरापूर आदी गावात प्रचारार्थ कांबळे बोलत होते. संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, रामदास वाघ, दिलीप शिंदे, भाऊसाहेब कुटे, अमित पंडित, मिलींद कानवडे, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, जगन चांडे, शांता खैरे, के.के.थोरात, गजानन घुले, बाळासाहेब शिंदे, भास्कर शेरमाळे, भगवंत हळनर, केशरचंद नेहे, हुसेन इनामदार, साहेबराव शेरमाळे, संजय शेरमाळे, संतोष नेहे, दिलीप नेहे, एकनाथ भास्कर, बाबासाहेब थिटमे आदी उपस्थित होते.आमदार कांबळे म्हणाले, २०१४ सारखी चूक पुन्हा करू नका. भाजपा सरकार फक्त घोषणाबाजी करते. विकासाची कुठलीही कामे त्यांनी केलेली नाहीत. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसांच्या हितासाठी केंद्रात कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे सरकार हवे आहे.माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम आपण करणार आहोत. खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणूक आल्यामुळे मतदारसंघात दिसत आहेत. यापूर्वी कधीही ते फिरकले नसून त्यांच्या भूलथापेला जनता आता बळी पडणार नसल्याचे देशमुख म्हणाले.आमदार कांबळे जनसामान्य माणसातील उमेदवार आहे. त्यांना संगमनेर तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळेल, असा विश्वास इंद्रजित थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी लक्ष्मण शेरमाळे, सोमनाथ शेरमाळे, रवी गायकवाड, पोपट शेरमाळे, अण्णा शेरमाळे, चंद्रकात नेहे, अण्णा राहिंज, कैलास पानसरे, मच्छिंद्र शिंदे, योगेश पवार, सदाशिव वाकचौरे, दादासाहेब देशमुख, सुनील शिंदे, किसन शिंदे, भास्कर बागुल, साबळे सर, बिजलाबाई पानसरे, शिवाजी शिंदे, शिवाजी आहेर, नाना वाघ, संजय साबळे, गंगाधर शिंदे, मंजुषा नवले उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019