शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

छोटा मोदी बोलले तरी कारवाई मग शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यावर काय कारवाई ? - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 19:26 IST

भाजपने सत्तेचा गैरवापर करत त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबला आहे. हजारो कोटी बुडवून पळालेल्या नीरव मोदीला छोटा मोदी बोलले तर सरकारकडून कारवाईची धमकी देता मग अहमदनगर भाजप उपमहापौराने आमचे दैवत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार?

अकोले/कोपरगाव :  भाजपने सत्तेचा गैरवापर करत त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबला आहे. हजारो कोटी बुडवून पळालेल्या नीरव मोदीला छोटा मोदी बोलले तर सरकारकडून कारवाईची धमकी देता मग अहमदनगर भाजप उपमहापौराने आमचे दैवत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार? असा संतप्त हल्लाबोल  सवालविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अकोले व कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या सभा संपन्न झाल्या. यावेळी मुंडे यांनी सरकारवर आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ.. अशी जाहीरातबाजी करत सत्ता मिळवलेला भाजप पक्ष हा फक्त सत्तेसाठी महाराजांच्या नावाचा वापर करतो. पण त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. म्हणूनच वारंवार शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपचे लोक करत असतात, याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले.

सरकारविरोधात बोलणाऱ्यांना नोटीसा पाठवणारे सरकार भाजपच्या लोकांवर आता काय कारवाई करणार ? हे आता महाराष्ट्र पाहतोय, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल अपशब्द काढलेला उपमहापौर श्रीपाद छिंदंम हा rss चा तृतीय पदवीचा कार्यकर्ता आहे.म्हणजे यावरूनच  शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रीय सेवा संघाचे विचार काय आहेत हे समजते असा हल्लाबोल त्यांनी केला.  राजीनामा , निलंबन करून भागणार नाही तर महाराजांबद्दल वाईट बोलणारी प्रवृत्ती संपली पाहिजे असे ते म्हणाले

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे