शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

पेरायचं काय अन् खायचं काय?

By admin | Updated: August 2, 2014 00:40 IST

अकोले: ‘पराडाची माती वरुन घसरुन येताय, मंग तुंबारा बसून चर फुटला, समदं वावर वाहून गेलं. पाच-सहा पायलीचा राब होता, समदा पाण्यात गेला.

अकोले: ‘पराडाची माती वरुन घसरुन येताय, मंग तुंबारा बसून चर फुटला, समदं वावर वाहून गेलं. पाच-सहा पायलीचा राब होता, समदा पाण्यात गेला. आवणीची वावरं मातीमैलान भरुन गेल्यात, आता पेरायचं काय अन् खायाच काय?’, अशी कैफीयत एकदरा येथील आदिवासी शेतकरी तुकाराम धोंडू भांगरे, पार्वताबाई भांगरे, चांगुनाबाई भांगरे मांडली. या नुकसानीची दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न त्यांना सतावतोय़बित्तमगड परिसरात महाकाय डोंगराच्या पायथ्याला वनक्षेत्रात चर खोदून पाणी आढळा खोऱ्यात आणण्याचा प्रकल्प सुरु आहे. आदिवासी विभागाच्या सहकार्याने वनविभागाने वनक्षेत्र ग्रामपंचायतीला हस्तांतरित केले असून, वनसमितीच्यावतीने काम सुरु आहे. चार सिमेंट बांध घालण्यात आले असून वन जमिनीत वृक्ष तोड झाली आहे. मात्र काही ठिकाणी मातीच्या चरावर नुकतेच बांबूची रोपे लावण्यात आली आहेत. केतकी, खराळाचा व वांजरघोटी ओहळ असे तीन ओढ्याचे पाणी एकत्र केले असून दीड किलोमीटरच्या चर कालव्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम अपुरे झाले असून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने चर काही ठिकाणी फुटला तर काही शेतांचे नुकसान झाल्याने पाणी वळवण्यात आले आहे.या पाण्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले असून काही रोपे वाहून गेली. काही शेतात गुडघ्या इतकी माती साचल्याने शेती दिसेनाशी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटले आहे. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी गांगरुन गेला आहे. वन जमिनीत चर खोदल्याने भविष्यात ‘माळीण’ गावासारखे येथेही जमिनीचे भूस्खलन होण्याची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. काळू धोंडू भांगरे, नाथु सखाराम भांगरे, वाळीबा भांगरे आदींच्या जमिनीचे व भात रोपांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भाजपाचे जालिंदर वाकचौरे व सेनेचे डॉ. शरद तळपाडे यांनी केली आहे.बिताका गावाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून, चिखलात गावकरी वाट धुंडाळताना दिसतात. रस्ता नावालाच शिल्लक राहिला आहे. चरामुळे झाडी नष्ट झाली असून येथे वृक्ष लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. दीड किलोमीटर लांब व ६५० ते ७०० फूट उंच अशा चौरसक्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचे पाणी चरातून धरणक्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्न आहे़ अधिक पावसामुळे शेतीची हानी होईल असे पाचघरवाडी, एकदरा, जायनावाडी, बिताका येथील गावकरी सांगतात. पर्यावरण पूरक काम नाही. मोठी रक्कम खर्च होऊन झुळझुळ पाणी वाहत आहे. आढळा लाभक्षेत्राला चराचा अपेक्षित फायदा दिसत नाही.-जालिंदर वाकचौरे, शेतकरीएकदरा, जायनावाडी भागात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़-रुपेश सुराणा, नायब तहसीलदारवनहद्दीत काम झाले असले तरी वनविभागाचा संबंध येत नाही. जमीन गावाकडे वर्ग केली असून वनसमिती व गावकरी यांच्यामार्फत काम सुरु आहे़-शिवाजी फटांगरे, उपविभागीय वन अधिकारी