शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची मिरवणूक, महिलेची तक्रार अन् नवरदेवाची पोलिसांत वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:48 IST

ती म्हणाली, आमचे प्रेमसंबंध..याने अनेकदा केला अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कराहाता (जि. अहमदनगर) : डीजेच्या तालावर नाचणारे वऱ्हाडी अन् घोड्यावर बसून लग्नाची स्वप्न रंगवणारा नवरदेव, असा आनंदाचा माहाेल असतानाच नाशिक येथील महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला पोलिस ठाण्यात नेले. बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवाला ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आल्याने वऱ्हाडी मंडळींचा हिरमाेड झाला. दरम्यान, उच्चशिक्षित नववधूसाठी नातेवाइकांनी नात्यातीलच वर शोधला अन् काही तासांतच नववधूचा विवाह दुसऱ्या नवरदेवासोबत लावून दिला. ही घटना रविवारी राहाता येथे घडली.

नाशिकच्या युवकाचा राहातामधील मुलीशी विवाह ठरला हाेता. रविवारी नवरदेव वऱ्हाडींसह येथे दाखल झाला. विवाह समारंभाची तयारी झाली. मिरवणूकही निघाली. दरम्यान, नाशिक येथील एका महिलेने आमचे प्रेमसंबंध असून लग्नाचे आमिष दाखवून याने माझ्यावर अनेकदा अत्याचार केला व माझी फसवणूक केल्याची तक्रार राहाता पोलिसांत दिली. 

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मिरवणुकीतून नवरदेवाला ताब्यात घेतले. नाशिकच्या या नवरदेवाविरुद्ध तेथीलच उच्चशिक्षित २६ वर्षीय महिलेने तक्रार दिल्याने एकच गोंधळ उडाला.  अक्षतारूपी आशीर्वाद प्राप्त होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता मंगलकार्यालयात पसरली व वऱ्हाडींत एकच गोंधळ उडाला. विवाहस्थळी काही अनर्थ नको म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्याचवेळी नवरदेवाकडून आलेल्या वऱ्हाडींनी मंगलकार्यालयातून काढता पाय घेतला. नवरदेवाचे नाशिक प्रकरण समोर आल्यावर नियोजित वधूचे त्याच्यासोबत लग्न न लावण्याचा निर्णय झाला.

मंडपातच शोधला दुसरा वर   आध्यात्मिक संस्कार व उच्चशिक्षित असलेल्या नववधूसाठी नातेवाइकांनी नात्यातीलच वर मंडपात शोधला.   शोधलेला नवरदेव मोठ्या मनाने पुढे आला.   उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने अक्षतारूपी आशीर्वादाने काही तासांतच या नववधूचा विवाह दुसऱ्या नवरदेवासोबत लावण्यात आला.

टॅग्स :marriageलग्न