उपसरपंच राहुल रावसाहेब साबळे (रा. रामपूर) असे आरोपीचे नाव आहे. रामपूरच्या ग्रामसेवक प्रतिभा गोरक्ष भरसाकळ यांनी फिर्याद दाखल केली.
राहुल साबळे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस रामपूर-सोनगाव रस्त्यालगत पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पाऊण इंच अनधिकृतपणे जलवाहिनी जोडणी केल्याचे तीन फेब्रुवारी २०२१ रोजी आढळले. साबळे यांनी घरात अनधिकृत नळजोडणी करून शासकीय पाण्याची चोरी केली आहे.
राहुल साबळे यांनी मागील ३० वर्षांपासून गावाच्या पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत नळजोडणी करून शासकीय पाण्याची चोरी करीत आहेत, अशी लेखी तक्रार ग्रामस्थ मनीषा मोरे, रावसाहेब पठारे, नितीन खळदकर, दत्तात्रेय नालकर, सुनील पठारे, दिलीप खळदकर, बाळासाहेब नालकर, शिवाजी नालकर, अनिल पठारे, किशोर पठारे, रवी पठारे, गवजी लोखंडे, केशव लोखंडे, भास्कर नालकर, गोकुळ शिंदे, सतीश भोसले, इंद्रभान भोसले, राजू मोरे यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली होती.
नळजोडणी बंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा उपोषण केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. घटनास्थळी ग्रामसेविकाच्या अधिपत्याखाली खोदकाम करून, पंचनामा करण्यात आला. त्यानुसार साबळे यांच्यावर पाणीचोरीचा गुन्हा दाखल केला.