करंजी : पाथर्डी तालुक्यातील वीस टंचाईग्रस्त गावांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. आणखी बारा गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती पाथर्डी पंचायत समितीचे उपसभापती संभाजी पालवे यांनी दिली. या वीस गावांमध्ये रोज टँकरच्या ५४ खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने टँकर मागणीचे प्रस्ताव दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरडगाव- ६, शिरापूर- ३, कडगाव- १, शंकरवाडी-१, वैजूबाभुळगाव- ३, जांभळी- २, देवराई-२, भिलवडे-३, निपाणी जळगाव-३, मोहज देवढे- ३, औरंगपूर- १, मांडवे-४, सोनोशी-३, भुतेटाकळी- ५, सोमठाणे खुर्द- २, नांदूर निंबादैत्य- ४, जिरेवाडी-२, मालेवाडी-४, दगडवाडी-२ या गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाड्या, वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठल्याने मे महिन्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. (वार्ताहर)
वीस गावांमध्ये पाणी टंचाई
By admin | Updated: April 15, 2024 12:20 IST