शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या नावाखाली ‘मुळा’ धरणाच्या पाण्याचा सुकाळ; आणखी एक शेतीसाठी मिळणार आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:17 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत्र पाण्याचा सुकाळ असल्याचे चित्र आहे.

भाऊसाहेब येवले । लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत्र पाण्याचा सुकाळ असल्याचे चित्र आहे. उन्हाळी हंगामातील आणखी एक पाण्याचे आवर्तन शेतीसाठी मिळण्याची चिन्हे आहेत. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये यंदा तब्बल ४१ हजार दशलक्ष घनफूट इतके पाणी नव्याने दाखल झाले होते. या आवर्तनामध्ये उजव्या कालव्यात खाली साडेचार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात पाणी वापर वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आणखी किती दिवस पाणी चालणार याबाबतही सर्वजण अनभिज्ञ आहेत. मुळा धरणाची पाण्याची पातळी घटल्याने वांबोरी चारी पाण्याचे आवर्तन बंद झाले आहे. ४० लाख रुपये पाणीपट्टी वसुली असताना प्रत्यक्षात ३५ हजार रुपये पाणीपट्टी वसूल झाल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. उजव्या कालव्यात खालील पाणीपट्टी थकीत असतानाही पाण्याचे आवर्तन सुरू आहे.उजवा कालवा कधी बंद होणार?मुळा धरणाच्या भरवशावर शेतक-यांनी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढविले आहे, असा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे.  राहुरी तालुक्यात १२ हजार हेक्टर, नेवासा  तालुक्यात ३५ हजार हेक्टर  तर शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात २० हजार हेक्टर ऊस लागवड झाली असल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे. उजव्या कालव्यात खाली २७९ पाणीवापर संस्था तर डाव्या कालव्याखालील १६ पाणीवापर संस्था आहेत. डाव्या कालव्याचे आवर्तन  सहाशे क्युसेकवरून २०  क्युसेक करण्यात आले आहे. डावा कालवा लवकरच बंद होत असून उजवा कालवा कधी बंद होणार याबाबत उत्सुकता आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी