शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

देर्डे-चांदवडच्या विद्यार्थ्यांनी बनवली पाण्यावर चालणारी सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:13 IST

जुनी सायकल घेऊन त्याला प्लास्टिकचे ड्रम बसवून चक्क पाण्यावर चालणारी सायकल कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड गावातील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे.

पारनेर : जुनी सायकल घेऊन त्याला प्लास्टिकचे ड्रम बसवून चक्क पाण्यावर चालणारी सायकल कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड गावातील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री संकुलात सुरू असलेल्या नगर जिल्हा गणित-विज्ञान प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरत आहे.  पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री संकुलात अहमदनगर जिल्हा गणित विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. यावेळी लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी प्रदर्शन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनव प्रयोग दिसून आले. यामध्ये राळेगणसिद्धीचा सिद्धेश पळसकर-शेतक-यांचा उपयोगी रोबोट,शिर्डीचा हर्षवर्धन गोदकर याचा भविष्यातील वाहतूक व्यवस्था, शेवगावच्या सिद्धार्थ शेळके याने अंडीतून पक्षी तयार करणारे यंत्र, श्रेयस कोथिंबीरे (श्रीगोंदा) याने हालचाल आयसीयू, पिंपळगाव माळवीच्या गणेश पोटे याने रोबोट, खेडच्या भूषण शिंदे याने एकत्रित शेती, सोनईच्या कौशिक वेल्हेकर याने जलशुद्धीकरण, राहुरीच्या रोहित लहारे याने सौरऊर्जा फवारणी यंत्र, जामखेडच्या प्रभा गांधी याने काचेच्या ऊर्जेतून भात शिजवणे, श्रीरामपूरच्या सोहम बडाख याने सोलर वॉटर अशी उपकरणे प्रदर्शनात मांडली आहेत. मातोश्रीचे प्रमुख किरण आहेर, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब       बुगे, बापूसाहेब तांबे, शिक्षण विस्तार अधिकारी विनेश लाळगे, संभाजी झावरे, जिल्हा गणित-विज्ञान संघटना मार्गदर्शक मधुकर बर्वे, जालिंदर आहेर आदींनी भेट देऊन पाहणी केली....अशी बनवली सायकलदेर्डे-चांदवड येथील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार यांनी शिक्षक रमेश हिंगे यांच्या मार्गदर्शनानुसार पाण्यावर चालणारी सायकल तयार केली आहे. आधी पाण्यात टायरच्या ट्यूबने शेततळे किंवा कालव्यात हे पोहत होते. परंतु ट्यूब फुटण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांनी सायकल बनविण्याचा निर्णय घेतला. सायकलचे चाके काढून ३५ लिटरचे चार मोकळे ड्रम घेऊन मागे दोन व पुढे दोन ड्रम लावून तीच चाके तयार केली.  ती पाण्यावर जोरदार चालत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरExhibitionप्रदर्शनStudentविद्यार्थी