शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

नगरला ३० वर्षांपासून शिक्षक आमदाराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:05 IST

पुढील वर्षी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने शिक्षकांची मतदारनोंदणी सुरू केली आहे. नाशिक विभागात येणा-या नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा विस्तृत मतदारसंघ असल्याने इच्छुक उमेदवारांना प्रचाराची कसरत करावी लागेल.

ठळक मुद्देनाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : गाडगे, कचरे, पंडित नगर जिल्ह्यातून इच्छुकमागील वेळी संपूर्ण मतदारसंघात ५२ हजार मतदार होते, त्यात नगरच्या १३ हजार मतदारांचा समावेश होता. १९८२ ते ८८ मध्ये रा. ह. शिंदे यांच्या रूपाने नगरला आमदारकी मिळाली होती

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : पुढील वर्षी होणा-या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे बिगूल वाजले असून, नगरमधून इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून नगर जिल्हा शिक्षक आमदारकीच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे यांच्यासह शिक्षक भारतीचे सुनील गाडगे, सुनील पंडित हे मैदानात उतरू शकतात.पुढील वर्षी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने शिक्षकांची मतदारनोंदणी सुरू केली आहे. नाशिक विभागात येणा-या नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा विस्तृत मतदारसंघ असल्याने इच्छुक उमेदवारांना प्रचाराची कसरत करावी लागेल. मागील वेळी संपूर्ण मतदारसंघात ५२ हजार मतदार होते, त्यात नगरच्या १३ हजार मतदारांचा समावेश होता. यावेळी आधीची संपूर्ण मतदारयादी बरखास्त करून पुन्हा नव्याने नोंदणी करण्यात येणार आहे. यावेळी ६० हजार मतदारांची नोंदणी होऊ शकते. त्यात नगरचा वाटा २० हजार शिक्षकांचा असू शकतो.गेल्या तीस वर्षांचा आढावा घेतला तर मतदारसंघावर नाशिक जिल्ह्याचेच वर्चस्व राहिले आहे. १९८२ ते ८८ मध्ये रा. ह. शिंदे यांच्या रूपाने नगरला आमदारकी मिळाली होती, एवढाच काय तो अपवाद. त्यानंतर अनेकांनी प्रयत्न करूनही अद्याप यश आलेले नाही. ज. यू. ठाकरे (धुळे), टी. एफ. पवार (नाशिक), दिलीप सोनवणे (जळगाव) व विद्यमान आमदार अपूर्व हिरे (नाशिक) असा हा आलेख नाशिकच्या आसपासच कायम राहिला.२००६ मध्ये राष्ट्रवादी शिक्षक संघटनेकडून प्रा. भाऊसाहेब कचरे व अपक्ष सुभाष कडलग यांनी, तर पुढे २०१२ मध्ये शिक्षक परिषदेकडून मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील पंडित व शिक्षक लोकशाही आघाडीकडून (टीडीएफ) राजेंद्र लांडे या नगर जिल्ह्यातील उमेदवारांनी नशिब आजमावले. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.यावेळी पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातून अनेकजण दंड थोपटण्याची चिन्हे आहेत. त्यात शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, मुख्याध्यापक संघटनेचे सुनील पंडित यांच्यासह शिक्षक भारतीचे नेते सुनील गाडगे इच्छुक आहेत. शिक्षक भारती या निवडणुकीत कोणाला पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवारी करणार असल्याचे आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी जाहीर केले आहे. गाडगे यांचे संघटनेतील योगदान, शिक्षकांशी दांडगा संपर्क लक्षात घेता शिक्षक भारतीकडून त्यांनाच उमेदवारीचे संकेत मिळत आहेत.