शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनो डायल @ १९५० : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 11:54 IST

देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

अहमदनगर : देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्र्क केंद्राची स्थापना करण्यात आली असून तेथे ‘१९५०’ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीबाबत असलेल्या प्रश्नांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी, मतदारयादीतील नाव व अनुक्रमांक, मतदारयादीत नाव समाविष्ट करणे किंवा दुरूस्त करणे यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने नागरिकांना व मतदारांना माहिती जिल्हा केंद्रातील ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: या क्रमांकावर दूरध्वनी करून या केंद्राचे औपचारिक उद्घाटन केले.जिल्हा निवडणूक शाखेतील लिपिक स्वाती राठोड यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मतदारांना येथे संपर्क करता येईल. प्रत्यक्ष निवडणूक कालावधीमध्ये हे केंद्र अहोरात्र सुरू राहणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लँडलाईन दूरध्वनी क्रमांकावरून उपलब्ध असून लवकरच मोबाईलवरूनही उपलब्ध करण्यात येईल. सर्व मतदारांनी यावर संपर्क करून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका